Skip to main content

मीडिया ब्रीफ : पालघर आणि ठाणे जिल्हा (महाराष्ट्र) बुलेट ट्रेन बांधकाम अद्यतन माहिती

Published Date

काही महत्वाची आकडेवारी

  • एकूण लांबी 135.45 कि.मी. (महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील शिळफाटा ते झरोली गाव यांच्या दरम्यान)
  • व्हायाडक्ट आणि पूल: 124 किमी
  • पूल आणि क्रॉसिंग: संख्या 36, ज्यात 11 स्टील पूल समाविष्ट आहेत
  • स्टेशन: संख्या 3 म्हणजे ठाणे, विरार आणि बोईसर (सर्व उन्नत)
  • डोंगरी बोगदे: संख्या 6.
  • नदी पूल: उल्हास नदी, वैतरणा आणि जगनी, यापैकी एमएएचएसआर प्रकल्पाचा सर्वात लांब पूल (2.32 किमी.) वैतरणा नदीवर बांधला जाणार आहे
  • 19 जुलै 2023 रोजी करारावर स्वाक्षरी केली
  • पॅकेजचे नाव: एमएएचएसआर -सी -3

महाराष्ट्रात बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या उन्नत भागात भौतिक बांधकाम सुरू झाले आहे. हा विभाग महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील शिळफाटा (मुंबईजवळ) ते झरोली गावापर्यंत एकूण 135 किमीचा आहे. उल्हास, वैतरणा आणि जगनी नद्यांसारख्या प्रमुख नदी पुलांवरील 6 डोंगरी बोगदे, 36 (संख्या) क्रॉसिंगसह 11 पोलादी पूल आणि नदी पूल यांचा समावेश असलेला हा विभाग प्रकल्पातील सर्वात गुंतागुंतीचा उन्नत भाग आहे. या विभागात वैतरणा नदीवर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सर्वात लांब पूल (2.32 किमी) आहे.

या विभागामध्ये ठाणे, विरार आणि बोईसर येथील तीन बुलेट ट्रेन स्थानकांचाही समावेश आहे. ही तिन्ही स्थानके मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) अंतर्गत येतात आणि ती मुंबईची उपनगरे मानली जातात. दररोज हजारो प्रवासी लोकल रेल्वे, कार, शहर बस इत्यादी विविध वाहतुकीच्या साधनांद्वारे या स्थानकांदरम्यान प्रवास करतात.

प्रकल्पासाठी सध्या खालील कामे सुरू आहेत

1)     100 टक्के जमीन संपादित. स्वच्छता आणि डागडुजीची कामे सुरू आहेत: 78 किमी पूर्ण झाले आहे.

2)   भुगर्भ तपासणी सुरू, 50 टक्के पेक्षा जास्त पूर्ण झाली आहे.

3)    19 ठिकाणी ओपन फाऊंडेशन आणि 42 ठिकाणी काम सुरू आहे.

Related Images