एनएचएसआरसीएल सुरत येथील आशियातील सर्वात मोठ्या भू-तंत्रज्ञान अन्वेषण प्रयोगशाळेमधील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते
राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाला चालना देण्यासाठी, एनएचएसआरसीएल स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी भू-तंत्रज्ञान अन्वेषण प्रयोगशाळेमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत आहे, जे मेसर्स एल अँड टीने सुरतमध्ये मुंबई-अहमदाबाद उच्च गती रेल्वे प्रकल्प (मेसर्स एल अँड टी वापी आणि अहमदाबाद दरम्यान नागरी कामे चालवत आहे) यांनी रचित केले आहे.
प्रयोगशाळा आशियातील सर्वात मोठी भू-तंत्रज्ञान प्रयोगशाळा मानली जाते आणि अभियंते, तंत्रज्ञ आणि कुशल कामगारांसह सुमारे 900 (जमिनीवर 500 आणि प्रयोगशाळांमध्ये 400) व्यक्तींसाठी रोजगार निर्माण केला आहे. प्रयोगशाळा अत्याधुनिक तपास उपकरणांनी सुसज्ज आहे. 20 भू-तंत्रज्ञान अभियंते आणि 188 प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्याद्वारे ही सुविधा दररोज 3500 चाचण्या आयोजित करू शकते.
प्रशिक्षणा दरम्यान, विद्यार्थ्यांना विविध भू-तांत्रिक तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांशी परिचित केले जाते. व्याख्यानांव्यतिरिक्त, प्रयोगशाळेच्या चाचण्यांद्वारे मातीची वैशिष्ट्ये निश्चित करण्यासाठी पट्टिका भार चाचणी, ढीग भार चाचणी सारख्या जमिनीवरील चाचण्या यांचे देखील प्रात्यक्षिक दाखविले जातात. सरदार वल्लभ भाई राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एसव्हीएनआयटी), सुरत येथील 35 विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीला या सुविधेत प्रशिक्षण आधीच मिळाले आहे.
एमएएचएसआर प्रकल्पामुळे स्थानिक भू-तंत्र तपासणी रचनेला त्यांची जुनी उपकरणे सुधारायलाही चालना मिळाली आहे. वलसाड, सुरत, वडोदरा, आनंद आणि अहमदाबाद येथील सुमारे 15 प्रयोगशाळांनी प्रकल्पासाठी आवश्यक आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करण्यासाठी त्यांच्या आधारभूत संरचनांमध्ये सुधारणा केली आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी पूर्णपणे स्वयंचलित आणि अर्ध-स्वयंचलित जमीन चाचणी यंत्रे देखील तैनात करण्यात आली आहेत.
सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SVNIT) चे विद्यार्थी सुरत येथील आशियातील सर्वात मोठ्या जिओटेक्निकल लॅबमध्ये प्रशिक्षण सत्रात सहभागी होत आहेत.

जिओटेक लॅब सुरत

सुरत (गुजरात) येथील आशियातील सर्वात मोठ्या जिओटेक्निकल प्रयोगशाळेतील सिव्हिल इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या आणि चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम सुरू ठेवत, सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय, सुरत येथील ५० विद्यार्थ्यांच्या आणखी एका तुकडीला भू-तांत्रिक चाचणी उपकरणांचे प्रशिक्षण देण्यात आले.