एनएचएसआरसीएल बाबत
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ची स्थापना 12 फेब्रुवारी 2016 रोजी 2013 च्या कंपनी कायद्याखाली भारतामध्ये हाय स्पीड रेल मार्गासाठी वित्त पुरवठा, बांथकाम, देखभाल आणि व्यवस्थापनाच्या उद्देशाने करण्यात आली होती. ही कंपनी संयुक्त क्षेत्रामध्ये ‘स्पेशल पर्पज व्हीकल’ म्हणून आदर्श असून रेल्वे मंत्रालयाद्वारे केंद्र सरकार आणि दोन राज्य सरकार अनु. गुजरात सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचा त्यात भांडवली सहभाग आहे.
हाय-स्पीड रेल (HSR) प्रकल्प एक तंत्रशास्त्रीय चमत्कार आहे, तसेच त्याचे अनेक गणनयोग्य लाभ देखील आहेत जसे प्रवास वेळेतील बचत, वाहन चालविण्याचा खर्च, प्रदूषण कपात, रोजगार निर्मिती, अपघातांमध्ये घट/वाढीव सुरक्षा, आयाती इंधनाला पर्याय, आणि प्रदूषकांमध्ये कपात. या प्रकल्पामुळे पायाभूत सुविधा देखील वाढतील आणि अर्थव्यवस्थेच्या वृद्धित भर पडेल. HSR ही एक समन्वित यंत्रणा असेल त्यामध्ये विविध घटकांचा एकंदरीत अधिकतम वापर केलेला असेल, अनु. हार्डवेअर, सॉफ्टवेअर, ह्युमन-वेअर, आणि त्यांचा इंटरफेस, इ.
कंपनीला हाय-स्पीड कॉरिडॉरचे संचालन करण्यासाठी सुमारे 3000 – 4000 कर्मचारी (अंदाजित) असे मनुष्यबळ लागेल. हे आवश्यक मनुष्यबळ हाय-स्पीड तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीमध्ये अतिशय कार्यक्षम असले पाहिजे जेणेकरुन हा प्रकल्प कार्यक्षम आणि प्रभावी पद्धतीने पूर्ण करता येईल. म्हणून, कंपनीने या दृष्टिने सोयीचे म्हणून वडोदरा इथे एक विशेष प्रशिक्षण संस्थेच्या बांधकामाला सुरुवात केली आहे.
कंपनी हाय स्पीड रेल्वे सिस्टीमचा वापर करुन जगातील मोजक्या देशांच्या (सुमारे 15) पंक्तीत भारताला स्थापित करेल.
NHSRCL कॉर्पोरेट कार्यालय 2 रा मजला, आशिया भवन, रोड क्र. 205, सेक्टर 9, द्वारका, नवी दिल्ली – 110077.
आमचा नवीनतम वार्षिक अहवाल इथे पाहता येईल एनएचएसआरसीएल माहितीपत्रक इथे पाहता येईल
हाय-स्पीड रेलचे लाभ
हाय-स्पीड रेल सुरु होण्यातून अनेक सामाजिक आणि आर्थिक लाभ मिळतात. याची सर्वात अलिकडील उदाहरणे आहेत जपान, युरोप आणि चीन जिथे हाय-स्पीड रेलने सामान्य नागरिकांना विविध शहरे आणि गावांच्या दरम्यान हाय स्पीड संपर्क व्यवस्था पुरवून अद्भुत सुविधा दिली आहे.
सामाजिक लाभः हाय-स्पीड रेलचे अनेक सकारात्मक फायदे आहेत जसे कमी खर्चात प्रवास, CO2 उत्सर्जनात कपात, समान प्रवासी संख्येसाठी 6 पदरी महामार्गापेक्षा तुलनेने कमी जागेची गरज आणि उच्च आर्थिक कार्यांमुळे रोजगार निर्मिती आणि अति वेगवान संपर्क व्यवस्था.
आर्थिक लाभ: HSR ची वाहतूक कार्स आणि विमानांच्या बहुतांशी आयाती डिझेल/पेट्रोल आणि हवाई इंधनाच्या तुलनेत देशांतर्गत निर्मित वीजेवर चालते. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला लाभ होईल आणि आयाती इंधनावरील त्याचे अवलंबित्व कमी होईल.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि युनिवर्सिटी ऑफ हँबर्गमधील संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासानुसार, एका नवीन हाय-स्पीड लाईनला जोडलेल्या शहरांमध्ये अशा मार्गावर नसलेल्या शेजाऱ्यांच्या तुलनेत GDP मध्ये किमान 2.7% वाढ झाली. त्यांच्या अभ्यासात असेही दिसून आले की हाय-स्पीड रेलद्वारे बाजारपेठेसोबत वाढीव संपर्काचा थेट संबंध GDP मधील वाढीसोबत आहे-बाजारपेठ संपर्कातील प्रत्येक 1% वाढीसोबत, GDP मध्ये 0.25% वाढ होत आहे. हे संशोधन कोलोन आणि फ्रँकफर्ट दरम्यानच्या लाईनवर केंद्रित होते जी 2002 मध्ये सुरु करण्यात आली आणि त्यावर 300 किमी प्रति तास वेगाने ट्रेन्स धावतात.
रायडरशिपः हाय-स्पीड रेल आरंभ करुन आंतरशहर प्रवासातील मोडल ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा हिस्सा बदलण्याचा NHSRCL चा उद्देश आहे. आम्ही तीन भागांमधून प्रवासी वाहतूक वळविणे/सुरु करण्याचे ध्येय ठेवले आहे. ही बदललेली मागणी, जी एकतर अन्य माध्यमे (उदा. कार्स, विमान) किंवा अन्य रेल्वे सेवा (उदा. इंटरसिटी) कडून HSR कडे प्रवाशांच्या माध्यम पसंतीमधील वळणामधून निर्माण होते; अर्थव्यवस्थेवर आधारित मागणीतील वाढ, जी भारतीय आर्थिक वृद्धिमधील प्रवासोबत संलग्न आहे, लोक जितके संपन्न तितके ते प्रवास करतात या गृहितकानुसार; आणि निर्माण केलेली मागणी जी एकतर सर्वसामान्य प्रवास खर्चावर “थेट” किंवा “अप्रत्यक्षपणे” प्रवाशाची गतिशिलता किंवा जीवनशैलीची निवड यांच्यातील सुधारणांवर अवलंबून असते.
आरंभी प्रत्येक दिशेकडून प्रति दिन 17,900 प्रवाशांना सेवा देण्याचा NHSRCL चा उद्देश आहे, यामध्ये नंतर वर्ष 2053 पर्यंत प्रत्येक दिशेने प्रति दिन 92,900 प्रवाशांपर्यंत वाढ करण्यात येईल.