वांद्रे-कुर्ला संकुल येथील मुंबई बुलेट ट्रेन भूमिगत स्थानक ते महाराष्ट्र राज्यातील शिळफाटा दरम्यान 21 किमी लांबीचा भारतातील पहिला भूमिगत/समुद्राखालील बोगदा बांधण्यात येत आहे. बोगद्याच्या 21 किमीपैकी 16 किमी टनेल बोरिंग मशिनद्वारे तर उर्वरित 5 किमी एनएटीएमद्वारे आहे. यात ठाणे खाडीतील 7 किलोमीटरच्या समुद्राखालील बोगद्याचाही समावेश आहे.
खालील ठिकाणी बांधकाम व खोदाकाम चांगल्या पद्धतीने सुरू आहे
- मुंबई एचएसआर स्थानकाच्या बांधकामस्थळी शाफ्ट 1: शाफ्ट खोली 36 मीटर, 100% सेकेंट पायलिंगचे काम पूर्ण, सध्या खोदकाम सुरू
- विक्रोळीतील शाफ्ट 2: शाफ्ट खोली 56 मीटर, 100% सेकेंट पायलिंगचे काम पूर्ण. आजमितीस शाफ्टसाठी सुमारे 92% खोदकाम पूर्ण झाले आहे.
- सावली (घणसोलीजवळ) येथील शाफ्ट 3: शाफ्ट खोली 39 मीटर, 100% खोदकाम पूर्ण झाले आहे. या शाफ्टमुळे या वर्षाच्या अखेरीस खाली उतरण्याची अपेक्षा असलेले पहिले टनेल बोरिंग मशीन उपलब्ध होणार आहे.
- शिळफाटा: बोगद्याचे हे एनएटीएम टोक आहे. पोर्टलचे काम पूर्ण झाले असून आतापर्यंत 200 मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे.
- एडीआयटी (अॅडिशनल ड्रिव्हन इंटरमीडिएट टनेल) पोर्टल: 394 मीटर लांबीचा एडीआयटी बोगदा 6 महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाला आहे. यामुळे शिळफाटा व्यतिरिक्त खोदकामासाठी दोन अतिरिक्त एनएटीएम फेसची सोय झाली आहे. या अतिरिक्त प्रवेशामुळे 700 मीटरहून अधिक भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.
अंतर्गत परिमाणाचे एडीआयटी: 11-मीटर x 6.4 मीटर बांधकाम आणि ऑपरेशनदरम्यान मुख्य बोगद्यात थेट वाहनांना प्रवेश देईल आणि आपत्कालीन परिस्थितीत स्थलांतर प्रक्रियेच्या उद्देशाने देखील वापरला जाऊ शकतो.
बांधकामस्थळांवर झुकाव, सेटलमेन्ट, कंपन, क्रॅक आणि विकृती यांचे निरीक्षण करण्यासाठी इंक्लिनोमीटर, व्हायब्रेशन मॉनिटर, ग्राउंड सेटलमेंट मार्कर, टिल्ट मीटर आदी विविध प्रकारची जिओटेक्निकल उपकरणे बसविण्यात आली आहेत. खोदकाम आणि बोगद्यासारख्या सुरू असलेल्या भूमिगत कामांना किंवा जागेच्या सभोवतालच्या वास्तूंना कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी ही उपकरणे महत्त्वाची भूमिका बजावतात.