बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील खरेरा नदीवरील पुलाचे बांधकाम 29 ऑक्टोबर 2024 रोजी पूर्ण झाले आहे. कॉरिडॉरसाठी वापी आणि सुरत बुलेट ट्रेन स्टेशन दरम्यान सर्व नऊ (09) नदी पूल बांधण्यात आले आहेत.
गुजरात राज्यातील 20 नदी पुलांपैकी हा 12 वा नदी पूल आहे.
खरेरा नदी पुलाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
- पुलाची लांबी : 120 मीटर
- यात 3 फुल स्पॅन गर्डर (प्रत्येकी 40 मीटर) आहेत
- पिअर्सची उंची – 14.5 मीटर ते 19 मीटर
- 4 मीटर व्यासाचा एक (01) वर्तुळाकार घाट व 5 मीटर व्यासाचा तीन (03) वर्तुळाकार घाट
- हा पूल वापी आणि बिलिमोरा बुलेट ट्रेन स्थानकादरम्यान आहे. कोलक, पार, औरंगा आणि कावेरी नदीवर या दोन्ही स्थानकांदरम्यान पूल पूर्ण झाले आहेत
- महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागात वांसदा तालुक्यातील डोंगरातून उगम पावणारी ही नदी अंबिका नदीच्या उपनद्यांपैकी एक आहे
- खरेरा नदी वापी बुलेट ट्रेन स्थानकापासून सुमारे 45 कि.मी. आणि बिलिमोरा बुलेट ट्रेन स्थानकापासून 6 कि.मी. अंतरावर आहे
गुजरातमध्ये पूर्ण होणारे 12 नदी पूल पुढीलप्रमाणे आहेत.
वापी आणि सुरत बुलेट ट्रेन स्टेशन दरम्यान: खरेरा (नवसारी जिल्हा), पार (वलसाड जिल्हा), पूर्णा (नवसारी जिल्हा), मिंधोला (नवसारी जिल्हा), अंबिका (नवसारी जिल्हा), औरंगा (वलसाड जिल्हा), कोलक नदी (वलसाड जिल्हा)), कावेरी नदी (नवसारी जिल्हा) आणि वेंगानिया (नवसारी जिल्हा) – एकूण ९
इतर पूर्ण झालेले नदी पूल : धादर (वडोदरा जिल्हा), मोहर (खेडा जिल्हा), वात्रक (खेडा जिल्हा) - एकूण ३