मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी दादरा आणि नगर हवेलीतील सिल्वासाजवळ 25 ऑगस्ट 2024 रोजी 100 मीटर लांबीचा स्टील पूल सुरू करण्यात आला आहे.
14.6 मीटर उंचीचा आणि 14.3 मीटर रुंदीचा हा 1464 मेट्रिक टन पोलादाचा पूल तामिळनाडूतील त्रिची येथील कार्यशाळेत तयार करण्यात आला असून तो ट्रेलरद्वारे बसविण्यासाठी त्या ठिकाणी नेण्यात आला आहे.
मध्यवर्ती आधार टाळण्यासाठी लॉन्चिंगसाठी 84 मीटर लांबीचे आणि 600 मेट्रिक टन वजनाचे तात्पुरते लाँचिंग नोस मुख्य पुलाला जोडण्यात आले होते. उद्घाटनाच्या वेळी पुलाच्या मजबुतीसाठी अतिरिक्त तात्पुरते अवयवदेखील बसविण्यात आले होते.
एकूण 27,500 नग एचएसएफजी (हाय-स्ट्रेंथ फ्रीक्शन ग्रिप) बोल्टचा वापर लाँचिंग नोज आणि अंदाजे 55,250 नग घटक जोडण्यासाठी केला गेला. मुख्य पुलासाठी सी5 सिस्टम पेंटिंग आणि इलास्टोमेरिक बेअरिंगसह टॉर-शियर टाइप हाय स्ट्रेंथ (टीटीएचएस) बोल्ट वापरले गेले.
जमिनीपासून 14.5 मीटर उंचीवर तात्पुरत्या ट्रेस्टलवर स्टीलचा पूल आणि लाँचिंग नोज एकत्र करण्यात आले आणि मॅक-अलॉय बारचा वापर करून प्रत्येकी 250 टन क्षमतेच्या 2 सेमी-ऑटोमॅटिक जॅकच्या स्वयंचलित यंत्रणेने तो खेचण्यात आला.
सुरक्षितता आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे सर्वोच्च मानक राखत बुलेट ट्रेन प्रकल्प काटेकोरपणे राबविला जात आहे. जपानच्या कौशल्याचा वापर करून भारत 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी स्वत:च्या तांत्रिक आणि भौतिक संसाधनांचा अधिकाधिक वापर करत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा स्टील पूल हे या प्रयत्नाचे मोठे उदाहरण आहे.
बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी पूर्ण झालेल्या 28 स्टील पुलांपैकी हा चौथा पूल आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
क्रमांक | ठिकाण | लाँचिंगची तारीख | स्टील पुलाची लांबी | स्टील पुलाचे वजन |
---|---|---|---|---|
1 | राष्ट्रीय महामार्ग 53 ओलांडून, सुरत, गुजरात | 03/10/2023 | 70 मीटर | 673 मेट्रिक टन |
2 | भारतीय रेल्वेच्या वडोदरा-अहमदाबाद मुख्य मार्गावर, नडियादजवळ, गुजरात | 14/04/2024 | 100 मीटर | 1486 मेट्रिक टन |
3 | दिल्ली-मुंबई राष्ट्रीय द्रुतगती महामार्गावर, वडोदराजवळ, गुजरात | 23/06/2024 | 130 मीटर | 3000 मेट्रिक टन |
4 | दादरा आणि नगर हवेलीतील सिल्वासाजवळ | 25/08/2024 | 100 मीटर | 1464 मेट्रिक टन |