मुख्य सामग्रीवर जा
मुख्य सामग्रीवर जा
Mar

NATIONAL HIGH SPEED RAIL CORPORATION LIMITED

नेशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

मीडिया ब्रीफ : गुजरातमध्ये प्रथमच साबरमती मल्टीमॉडल ट्रान्झिट हब बिल्डिंगसाठी

Published Date

ग्रीन एनर्जी- आरईएससीओ मोड अंतर्गत रूफ-टॉप सोलर प्लांट 

अहमदाबाद, गुजरातमधील साबरमती मल्टी मॉडेल ट्रान्झिट हब इमारतीने (रिन्यूएबल एनर्जी सर्विस कंपनी) आरईएससीओ मोड अंतर्गत 700 kWp सौर ऊर्जा संयंत्र स्थापित केले आहे.
साबरमती हब ही एक मल्टी-मॉडल ट्रान्झिट इमारत आहे जी एचएसआर प्रणालीसह रेल्वे स्टेशन, मेट्रो, बीआरटी आणि रस्ते वाहतूक यांसारख्या वाहतुकीच्या इतर पद्धतींना अखंडरीत्या जोडली जाईल.
नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल), मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरची अंमलबजावणी करणारी कंपनी हि आरईएससीओ मोडमध्ये नेट-मीटरिंगसाठी मान्यता मिळवणारी गुजरात राज्यातील पहिली संस्था बनली आहे आणि गुजरात एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (जीईडीए) कंपनीकडून नोंदणी प्राप्त झाली आहे.
या धोरणात्मक उपक्रमामुळे रु. 2.73 कोटी भांडवली खर्चात (कॅपेक्स) भरीव बचत झाली आहे, जी रुफ टॉप सोलर प्लांटच्या स्थापनेसाठी खर्च झाली असती.
25 वर्षांच्या उल्लेखनीय कालावधीसाठी एनएचएसआरसीएल द्वारे शून्य गुंतवणूक आणि देखभाल खर्चासह, सौरऊर्जा प्रकल्पातून दरवर्षी अंदाजे 10 लाख युनिट ग्रीन एनर्जी निर्माण करणे अपेक्षित आहे.
आरईएससीओ मोड अंतर्गत कार्यान्वित केलेल्या सोलर फोटोव्होल्टेइक (पीव्ही) प्रकल्पाचा पुढील २५ वर्षांसाठी रु. 3.9 प्रति युनिट या आकर्षक दराने करार करण्यात आला आहे. हा दर सध्याच्या डीआयएससीओएम दरापेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे, अंदाजे रु. 11 प्रति युनिट, आर्थिक व्यवहार्यता आणि रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन्स स्वीकारण्याच्या टिकाऊ फायद्यांवर भर देतो.
एनएचएसआरसीएलचा भविष्यातील दृष्टीकोन केवळ हरित भविष्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल दर्शवत नाही तर ऊर्जा वापराच्या क्षेत्रात शाश्वत पद्धतींचा शोध आणि अवलंब करण्यासाठी इतर संस्थांसाठी एक आदर्श देखील ठेवतो. त्याच्या पहिल्या रूफ-टॉप सोलर प्रकल्पाच्या नोंदणीसह, एनएचएसआरसीएलने त्याच्या स्टेशन्स, बिल्डिंग, डेपो आणि शेडमध्ये अशा प्रकारच्या आणखी प्रकल्पांची तयारी पूर्ण केली आहे.
Related Images