मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ट्रॅकवर्कच्या बांधकामासाठी सुरतमध्ये भारतीय अभियंते आणि वर्क लीडर्सचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.
ट्रॅक बांधकामावरील 20 दिवसांच्या प्रशिक्षण सत्रात स्लॅब ट्रॅक इन्स्टॉलेशन आणि सिमेंट अॅस्फॉल्ट मॉर्टर (सीएएम) इन्स्टॉलेशनवर लक्ष केंद्रित केले जाईल.
जेआयसीए (बुलेट ट्रेन प्रकल्पाची फंडिंग एजन्सी) यांनी नामनिर्देशित केलेल्या जेएआरटीएस (जपानमधील एक स्वयंसेवी संस्था) संबंधित क्षेत्रातील जपानी तज्ञांमार्फत हे प्रशिक्षण दिले जात आहे. सुमारे 20 अभियंते/वर्क लीडर/तंत्रज्ञ यांना या अभ्यासक्रमादरम्यान प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. सहा (06) जपानी तज्ञ भारतीय अभियंते, पर्यवेक्षक आणि तंत्रज्ञांना सखोल प्रशिक्षण देत आहेत.
साइट मॅनेजर, ट्रॅक स्लॅब मॅन्युफॅक्चरिंग, आरसी ट्रॅक बेड कन्स्ट्रक्शन, रेफरन्स पिन सर्व्हे आणि डेटा अॅनालिसिसचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.