मुख्य सामग्रीवर जा
मुख्य सामग्रीवर जा
Mar

NATIONAL HIGH SPEED RAIL CORPORATION LIMITED

नेशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

मीडिया संक्षिप्त: एनएचएसआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री विवेककुमार गुप्ता यांनी 6 जानेवारी 2025 रोजी पालघर जिल्ह्यातील बांधकाम स्थळांची पाहणी केली

Published Date

वैतरणा नदीवरील तात्पुरत्या प्रवेश पुलाच्या बांधकामाचा त्यांनी आढावा घेतला. एका बाजूला पश्चिम रेल्वेमार्ग आणि दुसऱ्या बाजूला दलदलीचा भाग यांच्यामध्ये वसलेला तात्पुरता प्रवेश पूल हा मुख्य पुलाच्या बांधकामासाठी मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेली महत्त्वाची वास्तू आहे.

वैतरणा नदीवरील पूल बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी 2.32 किमीचा सर्वात लांब नदी पूल असेल.

पालघर जिल्ह्यातील जलसर येथे असलेल्या एमएएचएसआर कॉरिडॉरच्या सर्वात लांब डोंगरी बोगद्यासाठी सुरू असलेल्या बांधकामाची ही त्यांनी पाहणी केली. हा 1.4 किमी (अंदाजे) बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम) वापरून तयार केला जात आहे. पालघर जिल्ह्यातील इतर डोंगरी बोगद्यांच्या कामाची ही त्यांनी पाहणी केली.

दोन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या गुंतागुंतीची वास्तू असलेल्या विरार बुलेट ट्रेन स्थानकाचा ही श्री गुप्ता यांनी आढावा घेतला.

Related Images