मुख्य सामग्रीवर जा
मुख्य सामग्रीवर जा
Mar

NATIONAL HIGH SPEED RAIL CORPORATION LIMITED

नेशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

मीडिया ब्रीफ: बुलेट ट्रेन प्रकल्प- भारतीय सिमेंट आणि बांधकाम उद्योगाला चालना मिळेल

Published Date

आतापर्यंत 78 लाख घनमीटर काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा 508 किमी लांबीचा, 12 स्थानके, 24 नदीवरील पूल, 8 पर्वतीय बोगदे आणि एक समुद्राखालील बोगदा असा मेगा प्रकल्प आहे.
या प्रकल्पामुळे बांधकाम उद्योग, रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळत आहे.
या मेगा प्रोजेक्टमध्ये उच्च दर्जाचे बांधकाम तंत्रज्ञान वापरले जात आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये दररोज सुमारे 20,000 घनमीटर काँक्रीटचा वापर केला जात आहे, जे 8 10 मजली इमारतींच्या समतुल्य आहे.
आतापर्यंत 13 लाख मोठ्या ट्रान्झिट मिक्सरद्वारे सुमारे 78 लाख घनमीटर काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या अडीच वर्षांपासून दररोज सुमारे 20 हजार कामगारांच्या मेहनतीमुळेच या स्तरावर काम करणे शक्य झाले असून, त्यामुळे रोजगाराला चालना मिळाली आहे.
हे मोठे कार्य पूर्ण करण्यासाठी, कॉरिडॉरच्या बाजूने 65 खास डिझाइन केलेले आणि बांधलेले काँक्रीट बॅचिंग प्लांट स्थापित केले आहेत.

Related Images