प्रवाशांना अखंडित जोडणी आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देण्यासाठी बुलेट ट्रेन स्थानकांवर मल्टी-मोडल इंटिग्रेशन (एमएमआय) सुविधा आणि अत्याधुनिक स्टेशन प्लाझा विकसित केले जात आहेत. या एकात्मिक विकासामुळे स्थानकांपर्यंत सोयीस्कर प्रवेश उपलब्ध होईल तसेच बुलेट ट्रेन स्थानक आणि विविध स्थानिक परिवहन साधनांदरम्यान प्रवाशांना सहज आणि कार्यक्षम बदल करता येतील.
या उपक्रमांतर्गत बुलेट ट्रेन स्थानकांच्या परिसराचा सर्वसमावेशक विकास केला जाईल आणि तो बस, टॅक्सी, खाजगी वाहने तसेच मध्यवर्ती सार्वजनिक परिवहन यांसारख्या इतर परिवहन प्रणालींशी अखंडपणे एकत्रित केला जाईल. यामुळे लास्ट-माइल कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल आणि प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर व सुबकपणे व्यवस्थापित ट्रान्झिट वातावरण उपलब्ध होईल.
स्टेशन प्लाझा हे सजीव आणि सुयोजित शहरी परिसर म्हणून विकसित केले जात असून ते प्रवाशांच्या सुरळीत हालचालीस मदत करतील तसेच एकूण प्रवासाचा अनुभव अधिक समृद्ध करतील. स्टेशन परिसराच्या विकासामध्ये पार्किंग क्षेत्रे, सार्वजनिक आणि खाजगी वाहनांसाठी स्वतंत्र पिक-अप व ड्रॉप-ऑफ झोन, स्ट्रीटस्केपिंग कामे, पादचारी अनुकूल फुटपाथ, माहितीपूर्ण साइनज प्रणाली, आधुनिक स्ट्रीट लाईटिंग, सीसीटीव्ही-आधारित निगराणी प्रणाली, लँडस्केपिंग आणि वृक्षारोपण यांसारख्या अत्यावश्यक प्रवासी सुविधांची निर्मिती समाविष्ट आहे. प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सोयीसाठी सार्वजनिक सुविधा तसेच प्रगत अग्निशमन प्रणाली देखील समाविष्ट केल्या जातील.
एकात्मिक प्रवासी पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण प्रगती साधत, एनएचएसआरसीएल ने सूरत, बिलिमोरा, वापी, भरुच, आनंद आणि वडोदरा येथील बुलेट ट्रेन स्थानकांवरील एमएमआय आणि स्टेशन परिसर विकासासाठीचे करार आधीच प्रदान केले आहेत.
विविध परिवहन साधनांना अखंडपणे जोडत आणि स्वागतार्ह तसेच हिरवळ असलेले सार्वजनिक परिसर तयार करत, हा उपक्रम भारतात शाश्वत व प्रवाशी-केंद्रित परिवहन पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीकोनाचे दर्शन घडवतो.
सूरत बुलेट ट्रेन स्टेशनची प्रगती
बांधकामाच्या इमारतीचे स्टील स्ट्रक्चरल व छप्पर पत्रीकरणाचे काम पूर्ण झाले असून, फिनिशिंगचे काम सुरू आहे. फॉल्स सिलिंग, भिंत आणि कॉलम क्लॅडिंगचे काम, तसेच प्लॅटफॉर्म आणि कन्कॉर्स फ्लोरिंगचे काम सुरू आहे. ट्रॅकचे काम देखील प्रगतीपथावर आहे.
बिलीमोरा बुलेट ट्रेन स्टेशनची प्रगती
रेल आणि प्लॅटफॉर्म लेव्हल स्लॅब कास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. स्ट्रक्चरल स्टील उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. आर्किटेक्चरल फिनिशिंग आणि एमईपी (यांत्रिक, वीज आणि प्लंबिंग) काम सुरू आहे.
आनंद बुलेट ट्रेन स्टेशनची प्रगती
कन्कॉर्स, रेल आणि प्लॅटफॉर्म लेव्हलसाठी स्लॅब कास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. छप्परासाठी स्ट्रक्चरल स्टील कामासह छप्पर पत्रीकरणाचे काम देखील पूर्ण झाले आहे. बाह्य फसाडसाठी स्ट्रक्चरल स्टील काम पूर्ण झाले आहे. स्टेशनवर लिफ्ट्स आणि एस्केलेटर बसवण्यात आले असून, सध्या क्लॅडिंगचे काम सुरू आहे.
वडोदरा बुलेट ट्रेन स्टेशनची प्रगती
कन्कॉर्स आणि ट्रॅक लेव्हलवरील स्लॅब कास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे, तर प्लॅटफॉर्म लेव्हलवरील स्लॅब कास्टिंगचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. स्ट्रक्चरल स्टील उभारणीचे काम देखील सुरू आहे.
भरूच बुलेट ट्रेन स्टेशनची प्रगती
रेल आणि प्लॅटफॉर्म स्लॅब कास्टिंगचे काम तसेच इमारतीसाठी स्ट्रक्चरल स्टील उभारणी पूर्ण झाली आहे. आर्किटेक्चरल फिनिशिंगचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.
वापी बुलेट ट्रेन स्टेशनची प्रगती
रेल आणि प्लॅटफॉर्म लेव्हलवरील स्लॅब कास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. स्ट्रक्चरल स्टील उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. स्टेशनसाठी वीज काम सध्या प्रगतीपथावर आहे.

