15 मार्च 2025 रोजी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील किम नदीवरील नदी पूल पूर्ण करण्यात आला आहे
गुजरातमध्ये या प्रकल्पासाठी पूर्ण झालेला हा 14 वा नदी पूल आहे. गुजरात विभागात एकूण 21 नदी पूल बांधले जातील.
किम नदी पुलाच्या तपशील पुढीलप्रमाणे आहेत:
● पुलाची लांबी 120 मीटर आहे.
● पुलामध्ये प्रत्येकी 40 मीटर लांबीचे 3 पूर्ण स्पॅन गर्डर आहेत.
● स्तंभांची उंची 12 मीटर ते 15 मीटर दरम्यान आहे.
● 4 मीटर व्यासाचे 4 गोलाकार स्तंभ.
● हा पूल सुरत आणि भरूच बुलेट ट्रेन स्थानकांच्या दरम्यान स्थित आहे.
● या दोन स्थानकांदरम्यान टापी नदी आणि नर्मदा नदीवरील इतर नदी पूल बांधकामाच्या प्रक्रियेत आहेत.
● ही नदी सुरत आणि भरूच बुलेट ट्रेन स्थानकांपासून सुमारे 30 किमी अंतरावर आहे.
गुजरातमधील बुलेट ट्रेन कॉरिडॉरवरील इतर पूर्ण झालेल्या नदी पुलांमध्ये हे समाविष्ट आहेत; पार (वलसाड जिल्हा), पुर्णा (नवसारी जिल्हा), मिंढोला (नवसारी जिल्हा), अंबिका (नवसारी जिल्हा), औरंगा (वलसाड जिल्हा), वेंगणिया (नवसारी जिल्हा), मोहर (खेड़ा जिल्हा), धाधर (वडोदरा जिल्हा), कोलाक (वलसाड जिल्हा), वात्रक (खेड़ा जिल्हा), कावेरी (नवसारी जिल्हा), खरेरा (नवसारी जिल्हा) आणि मेश्वा (खेड़ा जिल्हा).

