मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भारतीय अभियंते आणि कार्यप्रमुखांसाठी आणखी एक ट्रॅक बांधकाम प्रशिक्षण मॉड्यूल पूर्ण झाले. हा 20 दिवसांचा प्रत्यक्ष अनुभवावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम स्लैब ट्रॅक आणि सिमेंट ॲस्फाल्ट मोर्टार (CAM) स्थापनेशी संबंधित होता.
सुरत येथे हाय-स्पीड रेल ट्रॅक इंस्टॉलेशन प्रशिक्षणासाठी खास तयार केलेल्या ट्रॅक प्रशिक्षण सुविधेत कार्यक्रमादरम्यान सहा जपानी तज्ञांकडून 20 अभियंते, कार्यप्रमुख आणि तंत्रज्ञांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण मॉड्यूल यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर त्यांना प्रमाणित केले जाईल. जपानी तज्ञ बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ट्रॅक बांधकामासाठी 15 वेगवेगळ्या मॉड्यूल्समध्ये सुमारे 1000 भारतीय अभियंत्यांना प्रशिक्षित आणि प्रमाणित करतील.

