Published Date
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील वात्रक नदीवर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
पुलाची मुख्य वैशिष्ट्ये:
- लांबी: 280 मीटर
- 7 फुल स्पॅन गर्डर (प्रत्येकी 40 मीटर) पासून बनलेला आहे.
- पिलर्सची उंची - 09 मीटर ते 16 मीटर आहे.
- यात 3.5 मीटर आणि 4 मीटर व्यासाचे 08 गोलाकार पिलर्स आहेत.
- हा पूल आणंद आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशनच्या दरम्यान आहे. या दोन स्टेशनच्या दरम्यान मोहर नदीवर देखील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
- बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नियोजित 24 नदी पुलांपैकी हा 10 वा नदी पूल बांधण्यात आला आहे.
- ही नदी राजस्थानमधील डुंगरपूरच्या डोंगरातून उगम पावते आणि मेघराज तालुक्यातील मोयदी गावाजवळ गुजरातमध्ये प्रवेश करते.
- वात्रक नदी आणंद बुलेट ट्रेन स्टेशनपासून 25 कि.मी. आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशनपासून 30 कि.मी. अंतरावर आहे.

