नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या अंतर्गत असलेल्या हाय स्पीड रेल इनोव्हेशन सेंटर (HSRIC) ने रेल्वे क्षेत्रासाठी, विशेषतः हाय स्पीड रेल्वेसाठी स्वदेशी उपाययोजना विकसित करण्याच्या उद्देशाने विविध IITs आणि IISc बरोबर अनेक संयुक्त संशोधन प्रकल्प हाती घेतले आहेत.
HSRIC च्या 6व्या सल्लागार समितीची बैठक आज NHSRCL चे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीस NHSRCL चे संचालक व वरिष्ठ अधिकारी, रेल्वे तांत्रिक संशोधन संस्थेचे (जपान) अध्यक्ष, टोकियो विद्यापीठातील प्राध्यापक तसेच IIT दिल्ली, मुंबई, कानपूर, गांधीनगर, मद्रास, रुरकी, तिरुपती आणि खडगपूर येथील संचालक उपस्थित होते. या बैठकीत चालू प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
या प्रसंगी श्री. राजेंद्र प्रसाद म्हणाले, “IISc बंगळुरू, IIT बॉम्बे आणि IIT दिल्ली यांच्या सहकार्याने ट्रॅक्शन व पॉवर सप्लायच्या डिझाइन व पडताळणीसाठी सिमल्टेनियस सॉफ्टवेअरचे स्वदेशी विकास ही ‘मेक इन इंडिया’ दिशेने एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे, कारण सध्या आपण परदेशी सॉफ्टवेअरवर अवलंबून आहोत.”
चालू प्रकल्पांमध्ये सिव्हिल अभियांत्रिकी क्षेत्रातील - हाय स्पीड रेल्वे व रेल्वे उपयोगासाठी रिइन्फोर्स्ड अर्थ स्ट्रक्चर्सचा डिझाईन, हाय स्पीड ट्रॅकसाठी CAM वर सविस्तर अभ्यास, हाय स्पीड रेल्वे वायाडक्ट डिझाईनचे ऑप्टिमायझेशन आणि विद्युत क्षेत्रातील - पॉवर सप्लाय आणि ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) डिझाइनसाठी सिम्युलेशन मॉडेलिंग यांचा समावेश आहे.
विकासाबरोबरच, ट्रॅक्शन पॉवर सप्लाय सिस्टम आणि पॅंटोग्राफ व कॅटेनरी यांच्यातील डायनॅमिक इंटरॅक्शनच्या क्षेत्रात IIT दिल्ली, IISc व IIT बॉम्बेच्या टीमने HSRIC च्या अंतर्गत 2022-2023 मध्ये IEEE आणि VETOMAC (व्हायब्रेशन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑफ मशिनरी कॉन्फरन्स) मध्ये अनेक तांत्रिक पेपर्स प्रकाशित केले आहेत.
संलग्न: प्रतिमा

