Skip to main content
Skip to main content
Mar

NATIONAL HIGH SPEED RAIL CORPORATION LIMITED

नेशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

myth-vs-fact-banners1

मीडिया ब्रीफ: कन्स्ट्रक्शन अपडेट – २१ किमी बोगदा

Published Date

भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये २१ किलोमीटर लांबीचा बोगदा आहे. यापैकी ५ किलोमीटर भाग न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) वापरून पूर्णपणे खोदकाम करून तयार करण्यात आला आहे.

खोदकाम पूर्ण झाल्यानंतर आता बोगद्याच्या बांधकामाच्या पुढील टप्प्यांवर काम सुरू आहे.

बोगद्याच्या आत ड्रेनेज सिस्टीमचं काम सुरू आहे. ड्रेनेज कास्टिंग गॅन्ट्रीच्या मदतीने पाण्याचा झिरपणारा भाग सुरक्षितपणे गोळा करून स्वतंत्र ड्रेनेज सिस्टीममधून बाहेर पाठवला जातो.

यानंतर वॉटरप्रूफिंग गॅन्ट्रीद्वारे विशेष मेम्ब्रेन बसवण्यात येतात, ज्यामुळे बोगद्यात पाणी शिरू नये यासाठी मजबूत संरक्षण तयार होतं.

बोगद्याच्या आतील भागात स्टीलच्या सळ्यांचे जाळे (reinforcement cages) बसवले जात आहेत, जे अंतिम काँक्रीट स्ट्रक्चरला अधिक मजबुती देतात.

त्यानंतर लायनिंग गॅन्ट्रीद्वारे अंतिम काँक्रीट लेयर टाकला जातो, ज्यामुळे बोगद्याला कायमस्वरूपी मजबुती आणि गुळगुळीत फिनिश मिळते.

ऑपरेशन आणि मेंटेनन्ससाठी आवश्यक असलेली महत्त्वाची यंत्रणा ठेवण्यासाठी विशेष उपकरण कक्षही तयार केले जात आहेत.

प्रत्येक टप्पा नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण होत असल्याने भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टचा हा भूमिगत भाग पूर्णत्वाकडे वेगाने वाटचाल करत आहे.

Related Images