मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या व्हायाडक्ट बांधकामासाठी, गुजरातच्या वडोदरा आणि वापी येथे असलेल्या दोन कास्टिंग यार्डमध्ये प्रत्येकी 1000 फुल स्पॅन बॉक्स गर्डरची कास्टिंग पूर्ण झाली आहे.
352 कि.मी. लांबीच्या मार्गापैकी (गुजरात आणि डीएनएच), 290 कि.मी. व्हायाडक्टचे बांधकाम फुल स्पॅन लॉन्चिंग (एफएसएलएम) आणि उर्वरित मार्ग मुख्यतः सेगमेंटल लॉन्चिंग, 17 स्टील पूल, 8 स्टेशन्स, 350 मीटर बोगदा आणि इतर नागरी रचनांच्या माध्यमातून केले जाईल.
बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या व्हायाडक्ट बांधकामात वापरल्या जाणाऱ्या फुल स्पॅन गर्डरची लांबी साधारणपणे 40 मीटर असते आणि त्याचे वजन 970 मेट्रिक टन असते.
गुजरात आणि डीएनएच मधील फुल स्पॅन लॉन्चिंग गर्डरचा तपशील:
| व्याप्ती: फुल स्पॅन गर्डरची एकूण संख्या | कास्ट केलेले एफएसएलएम गर्डरची संख्या | व्हायाडक्ट बनवण्यासाठी लॉन्च केलेले एफएसएलएम गर्डरची संख्या |
|---|---|---|
| 7277 (290 कि.मी) | 5169 (207 कि.मी) | 4651 (186 कि.मी) |
हे कास्टिंग यार्ड पूर्वनियोजित समर्पित कारखाने आहेत जे मेक इन इंडिया मशिनरी जसे की स्ट्रॅडल कॅरियर्स, फुल स्पॅन लॉन्चिंग गॅन्ट्री, गर्डर ट्रान्सपोर्टर, ब्रिज गॅन्ट्री आणि फुल स्पॅन गर्डर कास्टिंग मोल्ड्सने सुसज्ज आहेत.
सध्या गुजरातमध्ये 213 किलोमीटर व्हायाडक्टचे बांधकाम पूर्ण झाले आहे, ज्यामध्ये एसबीएस (स्पॅन बाय स्पॅन) आणि एफएलएसएम लॉन्चिंग या दोन्हीचा समावेश आहे.

