Skip to main content
Skip to main content
Mar

NATIONAL HIGH SPEED RAIL CORPORATION LIMITED

नेशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

myth-vs-fact-banners1

मीडिया ब्रीफ: मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी सावली येथे दुसऱ्या TBM च्या असेंब्लीला सुरुवात

Published Date

मुंबईत (घनसोलीजवळ) सावली येथे जमिनीखाली सुमारे ३९ मीटर खोलीवर दुसऱ्या टनेल बोरिंग मशीन (TBM) ची असेंब्ली सुरू झाली आहे. ही TBM सावलीहून विक्रोळीच्या दिशेने आपला प्रवास सुरू करणार आहे.

आज १९० मेट्रिक टन वजनाचा गॅन्ट्री खाली उतरवण्यात आला. याची लांबी १८ मीटर, रुंदी १० मीटर आणि उंची ९ मीटर आहे.

दोन्ही TBM मध्ये मिळून एकूण ४ गॅन्ट्री असणार आहेत, जे मुख्य शिल्ड असेंब्ली आणि कटरहेडला जोडले जातील.

हे गॅन्ट्री TBM सोबत पूर्ण उत्खनन झालेल्या टनेलमध्ये पुढे जात राहतील आणि उत्खनन, वॉटरप्रूफिंग, टनेल लाइनिंग सेगमेंट बसवणे अशा महत्त्वाच्या कामांना सपोर्ट करतील.

सावली शाफ्टमध्ये जागा मर्यादित असल्यामुळे ३९ मीटर खाली TBM ची असेंब्ली अत्यंत काळजीपूर्वक प्लॅन करण्यात आली आहे.

TBM ची सुरुवातीची ड्राइव्ह जुलै २०२६ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.

Related Images