मुख्य सामग्रीवर जा
मुख्य सामग्रीवर जा
Mar

NATIONAL HIGH SPEED RAIL CORPORATION LIMITED

नेशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

About us Innerpage Slider

सामान्य प्रश्न

1. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरची लांबी किती आहे?
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे एकूण संरेखन 508 किमी आहे. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://nhsrcl.in/mr/about-us/about-nhsrcls
2. गुजरात, महाराष्ट्र आणि दादरा आणि नगर हवेलीतील बुलेट ट्रेन प्रकल्पाचे संरेखन किती आहे?
गुजरातमध्ये एकूण संरेखन 348 किमी, दादरा आणि नगर हवेली : 4 किमी आणि महाराष्ट्रात 156 किमी आहे अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://nhsrcl.in/mr/about-us/about-nhsrcls
3. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर किती स्थानकांची योजना आहे?
गुजरातमधील साबरमती, अहमदाबाद, आणंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलिमोरा, वापी आणि महाराष्ट्रातील बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई अशी 12 स्थानके या मार्गावर आहेत अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://nhsrcl.in/mr/all-stations
4. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर बुलेट ट्रेनचा जास्तीत जास्त वेग किती असेल?
बुलेट ट्रेनचा जास्तीत जास्त ऑपरेटिंग स्पीड ताशी 320 किमी असेल. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://nhsrcl.in/mr/about-us/about-nhsrcls
5. कॉरिडॉरसाठी मुंबई ते अहमदाबाद दरम्यान प्रवासाचा अपेक्षित कालावधी किती आहे?
संपूर्ण प्रवास मर्यादित थांबे (सुरत, वडोदरा आणि अहमदाबाद येथे) आणि सर्व थांब्यांसह (साबरमती, अहमदाबाद, आणंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलिमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई येथे) सुमारे 2 तास 58 मिनिटांत पूर्ण होईल अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://nhsrcl.in/mr/about-us/about-nhsrcls
6. प्रकल्पासाठी लागणारी एकूण जमीन किती आहे आणि किती भूसंपादन झाले आहे?
संरेखनासाठी निश्चित करण्यात आलेल्या 1390 हेक्टर जमिनीपैकी 430 हेक्टर जमीन महाराष्ट्रात तर 960 हेक्टर जमीन गुजरात आणि दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात आहे. या प्रकल्पासाठी १०० टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे.
7. एमएएचएसआर कॉरिडॉरसाठी कोणत्या तंत्रज्ञानाची निवड करण्यात आली आहे?
हाय स्पीड रेल्वेमधील सर्वोत्कृष्ट जागतिक तंत्रज्ञानांपैकी एक- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी जपानी शिंकानसेन तंत्रज्ञानाची निवड करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://nhsrcl.in/mr/project/safety-features
8. बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये किती डोंगर बोगदे असतील?
कॉरिडॉरसाठी एकूण सात डोंगरबोगदे बांधले जात आहेत. त्यापैकी सहा महाराष्ट्रातील तर एक गुजरातमधील आहे
9. बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी किती नदी पुलांची योजना आहे?
संरेखनाचा एक भाग म्हणून 24 नदी पूल बांधले जात आहेत, त्यापैकी 20 पूल गुजरात राज्यात आणि 4 पूल महाराष्ट्र राज्यात आहेत
10. बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी किती स्टील पुलांची योजना आहे?
राष्ट्रीय व राज्य महामार्ग, सिंचन कालवे व रेल्वे रुळांवर पसरलेल्या कॉरिडॉरवर 28 पोलादपुलांचे नियोजन करण्यात आले आहे
11. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या बांधकामाला गती देण्यासाठी कोणते तंत्र वापरले जात आहे?
वायडक्ट बांधकामाला गती मिळावी यासाठी सेगमेंटल लाँचिंग पद्धतीबरोबरच फुल स्पॅन लाँचिंग मेथड (एफएसएलएम) वापरली जात आहे.
12. भारतातील पहिल्या भूमिगत/समुद्राखालील रेल्वे बोगद्याची लांबी किती आहे?
महाराष्ट्रातील मुंबई येथे 21 किमी लांबीचा बोगदा बांधण्यात येत असून त्यात 7 किमी लांबीच्या समुद्राखालील बोगद्याचा समावेश आहे. मुंबईहून सुरू होणारा आणि महाराष्ट्रातील शिळफाटा येथे येणारा हा पहिला समुद्राखालील रेल्वे बोगदा आहे अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://nhsrcl.in/mr/project/project-highlights
13. या प्रकल्पाद्वारे भारतात प्रथमच कोणती नवीन ट्रॅक सिस्टीम आणली जात आहे?
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात जपानी शिंकानसेन ट्रॅक सिस्टीमवर आधारित गिट्टीविरहित ट्रॅकची जे-स्लॅब ट्रॅक सिस्टीम असेल. जे-स्लॅब बॅलास्टलेस ट्रॅक सिस्टीमचा वापर भारतात पहिल्यांदाच केला जात आहे
14. बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी किती रोलिंग स्टॉक डेपोची योजना आहे?
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गुजरातमधील साबरमती आणि सुरत आणि महाराष्ट्रातील ठाणे येथील तीन रोलिंग स्टॉक डेपोद्वारे सेवा दिली जाईल. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://nhsrcl.in/mr/project/maintenance
15. बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी सर्वात मोठा आणि मदर डेपो कोणता आहे?
साबरमती रोलिंग स्टॉक डेपो हा तीन डेपोंपैकी सर्वात मोठा डेपो असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे 83 हेक्टर आहे अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://nhsrcl.in/mr/project/maintenance