Skip to main content
Skip to main content
Mar

NATIONAL HIGH SPEED RAIL CORPORATION LIMITED

नेशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

myth-vs-fact-banners1

अहमदाबादला मिळत आहे वाहतूक जोडणीत नवीन आयाम

Published Date

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरसाठी (एमएएचएसआर) भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा 508 किलोमीटर लांबीचा मार्ग 12 स्टेशन्सवरून जाईल; गुजरातमध्ये 8 आणि महाराष्ट्रात 4.

320 किमी/तास वेगाने धावणारी हाय स्पीड ट्रेन, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात असलेल्या दोन वित्तीय केंद्रांदरम्यान जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. मुंबईहून सुरू होणारी ही ट्रेन, मधल्या 10 शहरांमध्ये म्हणजेच ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद येथे थांबल्यानंतर अंतिम थांबा साबरमती असेल.

अहमदाबाद जिल्ह्यातील प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये:
• एकूण मार्ग: 26 कि.मी.
• बुलेट ट्रेन स्टेशन्सची संख्या: २ (एलिव्हेटेड)
    - साबरमती
    - अहमदाबाद
• साबरमती नदीवरील पूल (निर्माणाधीन)
• साबरमती रोलिंग स्टॉक डेपो
• साबरमती येथे हाय स्पीड रेल मल्टीमॉडल हब

अहमदाबाद एचएसआर स्टेशन

अहमदाबाद एचएसआर स्टेशन शहराच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेने प्रेरित आहे. त्याचे छत शेकडो पतंगांच्या कॅनव्हासचे प्रतिनिधित्व करते, तर त्याचे बाह्य स्वरूप सय्यद सिद्दीकीच्या जाळीने प्रेरित आहे.

हे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 10, 11 आणि 12 च्या वर असलेल्या सध्याच्या पश्चिम रेल्वे स्टेशनवर सुमारे 38,000 चौरस मीटर क्षेत्रात बांधण्याची योजना आहे.
• प्लॅटफॉर्मची संख्या: 2
• स्टेशनची उंची: जमिनीच्या पातळीपासून 33.73 मीटर
• 435 मीटर लांबीच्या कॉन्कोर्स लेवल स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. प्लॅटफॉर्म लेवल स्लॅबचे काम सुरू आहे.

स्टेशन कनेक्टिव्हिटी योजना: (परिशिष्ट-1 पहा)

• वाहतुकीच्या इतर साधनांशी एचएसआर स्टेशनचे अखंड एकत्रीकरण सुनिश्चित करण्यासाठी, सध्याच्या रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील बाजूस प्रवासी वाहतुकीसाठी एकात्मिक इमारतीची योजना आखली आहे, जिथे प्रवासी एस्केलेटर आणि लिफ्टचा वापर करून सहजपणे स्थलांतर करू शकतील.
• प्लॅटफॉर्म 1 ते 9 पर्यंत येणाऱ्या प्रवाशांसाठी डब्ल्यूआर (WR) एफओबीमधून कनेक्शन देण्यासाठी इमारत अहमदाबाद रेल्वे स्टेशनशी जोडली जाईल आणि दुसरीकडे ती सरसपूरच्या दिशेने भूमिगत काळूपूर मेट्रो स्टेशनला जोडली जाईल.
• एचएसआर स्टेशन अहमदाबाद विमानतळापर्यंत सहज पोहोच प्रदान करेल, जे सुमारे 10 कि.मी. अंतरावर आहे आणि जवळचे गीता मंदिर सेंट्रल बस स्टँड 3.5 कि.मी. अंतरावर आहे.

साबरमती एचएसआर स्टेशन

एमएएचएसआर कॉरिडॉरचे टर्मिनल स्टेशन साबरमती, महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमातील चरख्याने प्रेरित आहे. हे स्टेशन सुमारे 45,094 चौरस मीटर क्षेत्रात बांधण्याची योजना आहे.
• प्लॅटफॉर्मची संख्या: 4
• स्टेशनची उंची: जमिनीच्या पातळीपासून 44 मीटर
• प्रवाशांची पोहोच आणि सुविधा वाढवण्यासाठी साबरमती एचएसआर स्टेशनची स्टेशन एरिया डेव्हलपमेंटसाठी निवड करण्यात आली आहे.
• स्टेशनच्या पायाभूत कामाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पहिल्या मजल्यावरील स्लॅब कास्टिंगचे काम सुरू आहे.

स्टेशन कनेक्टिव्हिटी योजना: (परिशिष्ट -2 पहा)

• हे स्टेशन सध्याच्या साबरमती रेल्वे स्टेशनच्या (बी/डब्ल्यू ब्रॉड गेज (पूर्व) आणि मीटर गेज (पश्चिम) स्टेशन्स) रेल्वे यार्ड क्षेत्रात स्थित आहे आणि ते सध्याच्या वाहतूक साधनांशी एकत्रित केले जाईल:
    - साबरमतीची २ रेल्वे स्टेशन्स (एसबीटी आणि एसबीआई-बीजी)
    - साबरमती मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हब
    - मेट्रो स्टेशन
    - बीआरटीएस स्टॉप

• अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ सर्वात जवळचे विमानतळ आहे, जे आगामी साबरमती एचएसआर स्टेशनपासून सुमारे ९ किलोमीटर अंतरावर आहे.
• नरेंद्र मोदी स्टेडियम (मोटेरा स्टेडियम) सुमारे ६ किलोमीटर अंतरावर आहे.

साबरमती नदीवरील पूल

एमएएचएसआर अलाइनमेंट गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील साबरमती नदीवरून जाईल.
पुलाची प्रमुख वैशिष्ट्ये:
• पुलाची लांबी: ४८० मीटर
• नदीची रुंदी: ३५० मीटर
• यात ७६ मीटरचे ५ आणि ५० मीटरचे २ स्पॅन आहेत.
• पिलर्सची उंची: ३१ ते ३३.५ मीटर
• ६ मीटर आणि ६.५ मीटर व्यासाचे गोलाकार खांब
• हा पूल साबरमती आणि अहमदाबाद एचएसआर स्टेशनच्या दरम्यान आहे.

साबरमती रोलिंग स्टॉक डेपो

साबरमती रोलिंग स्टॉक डेपो सुमारे ८३ हेक्टर क्षेत्रातील सर्वात मोठा डेपो असेल. यात तपासणी बे, वॉशिंग प्लांट, कार्यशाळा, शेड, स्टेबलिंग लाईन्स इत्यादींसह ट्रेनसेटच्या हलक्या आणि जड देखभालीसाठी अत्याधुनिक उपकरणे असतील. या डेपोमध्ये १० स्टेबलिंग लाईन्स असतील, ज्या भविष्यात २९ लाईन्सपर्यंत वाढवल्या जातील.

ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंगसाठी खोदकामाचे काम पूर्ण झाले आहे. स्टील स्ट्रक्चर्ससाठी डिझाइन अप्रूव्हल, जिथे ट्रेनसेट देखरेख आणि ओव्हरहॉलसाठी तपासणी बे, खड्डे आणि डेपो मशिनरी स्थित असतील, प्रगतीपथावर आहेत. डेपोसाठी जमीन तयार करण्याचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे.

डेपोमध्ये योग्य जल संसाधन व्यवस्थापनासाठी प्रणाली असतील. साबरमती डेपोची पाण्याची गरज छतावरील पावसाचे पाणी साठवण आणि बोअरवेलमधून काढलेल्या पाण्याने जवळपास पूर्ण केली जाईल. महानगरपालिकेच्या पुरवठ्यावर अवलंबित्व थोडेच असेल. पावसाचे पाणी गोळा करून डेपो परिसरात भूमिगत टाक्यांमध्ये साठवले जाईल. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून ते वापरासाठी योग्य बनवले जाईल. डेपोमधून पृष्ठभागावरील पाणी निचरा डेपो परिसरात असलेल्या खुल्या जल जलाशयांमध्ये सोडले जाईल आणि त्याचा उपयोग जलभृत रिचार्ज करण्यासाठी देखील केला जाईल. ट्रेनसेट आणि डेपोमध्ये तयार होणारे सांडपाणी आणि कचरा आधुनिक सांडपाणी प्रक्रिया आणि कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये प्रक्रिया करून पुनर्वापर केला जाईल. हे पुनर्वापर केलेले पाणी एकूण डेपोच्या सुमारे ७०% पाण्याची गरज पूर्ण करेल.

ट्रेन्स तसेच डेपोमध्ये तयार होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण, कॉम्पॅक्ट करणे आणि व्यवस्थापन करण्यासाठी साबरमती डेपोमध्ये गार्बेज हैंडलिंग सुविधा पुरविली जाईल.

साबरमती येथे हाय स्पीड रेल मल्टीमॉडल हब

साबरमती मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हब हे साबरमती रेल्वे स्टेशन्स, मेट्रो स्टेशन, निर्माणाधीन साबरमती एचएसआर स्टेशन आणि बस रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टमला अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी एक अत्याधुनिक इमारत आहे.

ही प्रतिष्ठित इमारत मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरचा अविभाज्य भाग आहे, जो नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे पूर्ण केला जात आहे.

या उत्कृष्ट संरचनेच्या दर्शनी भागात स्टेनलेस स्टीलचे बनलेले एक मोठे भित्तिचित्र आहे, जे दांडी मार्च आंदोलनाचे चित्रण करते. नयनरम्य स्टेप गार्डन स्वरूपात व्यवस्थित केलेल्या स्वदेशी वनस्पतींच्या उद्यानाच्या क्षेत्रामुळे सौंदर्य आणखी वाढले आहे.

हब बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर एक कॉन्कोर्स आहे, जो प्रवाशांसाठी वेटिंग लाउंज, रिटेल पर्याय आणि रेस्टॉरंट्ससारख्या सुविधा पुरवतो.

कॉन्कोर्स फ्लोअरच्या वरील बिल्डिंग ब्लॉकला दोन वेगवेगळ्या ब्लॉक्समध्ये, “ए” आणि “बी” मध्ये विभागले गेले आहे, जे दोन स्तरांवर छतांनी जोडलेले आहेत. ब्लॉक “ए” मध्ये कॉन्कोर्सच्या वर ऑफिस स्पेसचे सहा मजले आहेत, तर ब्लॉक “बी”, चार मजल्यांसह, बँक्वेट हॉल, कॉन्फरन्स रूम्स, स्विमिंग पूल आणि रेस्टॉरंटसह हॉटेल सुविधेसाठी डिझाइन केलेले आहे.

या सुविधेत पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ बे सह सुमारे १३०० वाहनांसाठी पुरेशी पार्किंगची सोय असेल.

हबमध्ये ग्रीन बिल्डिंग वैशिष्ट्ये जसे की छतावरील सौर पॅनेल, लँडस्केप टेरेस गार्डन, ऊर्जा-कार्यक्षम फिक्स्चर आणि भरपूर नैसर्गिक प्रकाश इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. पर्यावरणाची काळजी घेण्यासोबतच ही इमारत ऊर्जा कार्यक्षम आहे.