Skip to main content
Skip to main content
Mar

NATIONAL HIGH SPEED RAIL CORPORATION LIMITED

नेशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

myth-vs-fact-banners1

एमएएचएसआर ई-1 पॅकेज विषयी माहिती

Published Date

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड एमएएचएसआर साठी 2 x 25 केव्ही पॉवर सप्लाय इलेक्ट्रिफिकेशन सिस्टमच्या डिझाइन, मॅन्युफॅक्चरिंग, पुरवठा, बांधकाम, इंस्टॉलेशन, टेस्टिंग आणि कमिशनिंगसाठी निविदा मागवते. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख 17 एप्रिल 2023 आहे.

ईडब्ल्यू-1 पॅकेज म्हणजे मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरच्या (एमएएचएसआर) संपूर्ण 508 कि.मी. लांबीसाठी 2x25 केव्ही पॉवर सप्लाय इलेक्ट्रिफिकेशन सिस्टम (ट्रॅक्शन पॉवर सप्लाय, डिस्ट्रीब्यूशन पॉवर सप्लाय, ओव्हरहेड इक्विपमेंट) चे "डिझाइन, मॅन्युफॅक्चरिंग, पुरवठा, बांधकाम, इंस्टॉलेशन, टेस्टिंग आणि कमिशनिंग".

उपरोक्त कामे 320 कि.मी. प्रति तास वेगापर्यंत हाय स्पीड ट्रेन्स चालवण्यासाठी योग्य असतील आणि प्रमुख सिस्टीम खालीलप्रमाणे आहेत:

  • ट्रॅक्शन पॉवर सप्लाय सिस्टीम ज्यामध्ये 14 नग ट्रॅक्शन सबस्टेशन्स आणि संबंधित कामांचा समावेश आहे.
  • नॉन-ट्रॅक्शन लोडसाठी डिस्ट्रीब्यूशन पॉवर सप्लाय सिस्टीम.
  • संपूर्ण 508 कि.मी. लांबी आणि डेपोंसाठी ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई).


"मेक इन इंडिया" तरतुदीनुसार, भारतातून घेण्यात येणाऱ्या पॉवर सप्लाय आणि ओएचई साठीच्या साहित्यामध्ये विविध प्रकारचे ट्रान्सफॉर्मर, स्विचगियर, प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस, केबल्स, स्टील पाईप मास्ट इत्यादींचा समावेश आहे.

काही साहित्य आणि उपकरणे जी हाय-स्पीड रेलवर सिद्ध झाली आहेत ती जपानमधून आयात केली जातील (उदाहरणार्थ, कॅन्टिलिव्हर असेंब्ली, ओव्हरहेड कंडक्टर इत्यादी).

Related Images