एमएएचएसआर कॉरिडॉरसाठी 100% नागरी करार पूर्ण
एनएचएसआरसीएल द्वारे महाराष्ट्र राज्यात अंतिम नागरी करार (एमएएचएसआर- सी 3) ज्यात 135 कि.मी. एमएएचएसआर संरेखणात 7 बोगदे आणि महाराष्ट्र राज्यात वैतरणा नदीवर 2 कि.मी. चा सर्वात लांब पूल समाविष्ट आहे, प्रदान करण्यात आला.
यासोबतच, महाराष्ट्र राज्याचे तिन्ही नागरी बांधकाम करार: मुंबई (बीकेसी) एचएसआर स्टेशन (सी 1), 21 कि.मी. बोगद्यासह 7 कि.मी. समुद्राखालील बोगदा (सी 2) आणि 135 कि.मी. संरेखण (सी 3) देण्यात आले आहेत.
हा 508 कि.मी. लांबीच्या एमएएचएसआर कॉरिडॉरच्या सर्व 11 नागरी पॅकेजेसच्या कराराचा देखील प्रतीक आहे, ज्यात 465 कि.मी. लांबीचा व्हायाडक्ट, 12 एचएसआर स्टेशन, 3 रोलिंग स्टॉक डेपो, 10 कि.मी. व्हायाडक्ट असलेले 28 स्टील पूल, 24 नदी पूल, 7 कि.मी. लांबीचा भारतातील पहिला समुद्राखालील बोगद्यासह 9 बोगदे समाविष्ट आहेत.
एमएएचएसआर कॉरिडॉर 28 करार पॅकेजेसमध्ये विभागलेला आहे, त्यापैकी 11 नागरी पॅकेजेस आहेत, जे 33 महिन्यांच्या कालावधीत करारबद्ध झाले आहेत. गुजरात राज्यात 4 एचएसआर स्टेशन्स (वापी, बिलिमोरा, सुरत आणि भरूच) आणि सुरत रोलिंग स्टॉक डेपोसह 237 कि.मी. व्हायाडक्टच्या बांधकामासाठी पहिला नागरी करार 28 ऑक्टोबर 2020 रोजी देण्यात आला, जो भारताचा सर्वात मोठा नागरी करार देखील होता. महाराष्ट्र राज्यात 3 एचएसआर स्टेशन्स (ठाणे, विरार आणि बोईसर) सह 135 कि.मी. व्हायाडक्टचा अंतिम नागरी करार 19 जुलै 2023 रोजी देण्यात आला.
व्हायाडक्टच्या बांधकामास गती देण्यासाठी, भारतात प्रथमच, 970 टन वजनाचे 40 मीटर लांबीचे फुल स्पॅन गर्डर्स एका विशिष्ट प्रकारच्या फुल स्पॅन लॉन्चिंग उपकरण संचाद्वारे: स्ट्रॅडल कॅरियर, ब्रिज गॅन्ट्री, गर्डर ट्रान्सपोर्टर आणि गर्डर लॉन्चर, लॉन्च केले गेले आहेत, जे भारतात डिझाइन आणि तयार केले गेले आहेत. हे तंत्रज्ञान पारंपरिक सेगमेंट लॉन्चिंग तंत्रज्ञानापेक्षा सुमारे 10 पट वेगवान आहे आणि या तंत्रज्ञानाने बांधकाम उद्योगाला एक नवीन आयाम दिला आहे.
या मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये 1.6 कोटी घनमीटर सिमेंट आणि 17 लाख मेट्रिक टन स्टीलचा वापर अपेक्षित आहे आणि ते सिमेंट आणि स्टील उद्योगांना चालना देण्यासाठी उत्प्रेरक म्हणून कार्य करेल.
508 कि.मी. एमएएचएसआर अलाइनमेंटपैकी, गुजरातमध्ये, 352 कि.मी. साठी ट्रॅक कामांसाठी निविदा देखील प्रदान केल्या गेल्या आहेत. एमएएचएसआर कॉरिडॉरसाठी हाय-स्पीड रेल ट्रॅक सिस्टमसाठी भारतीय अभियंते आणि वर्क लीडर्सचे प्रशिक्षण यापूर्वीच सुरू झाले आहे. सुरत डेपोमध्ये विशेषतः तयार केलेल्या सुविधेत सुमारे 1000 अभियंते/ वर्क लीडर्स /तंत्रज्ञांना प्रशिक्षित करण्याची योजना आहे. ज्यात, सुमारे 20 जपानी तज्ञ भारतीय अभियंते, पर्यवेक्षक आणि तंत्रज्ञांना गहन प्रशिक्षण देतील आणि त्यांच्या कौशल्यांचे प्रमाणीकरण करतील.
एमएएचएसआर-सी -3 पॅकेजवरील अतिरिक्त तपशील
- एकूण लांबी 135 कि.मी. (महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील शिल्फाटा आणि झारोली गावा दरम्यान)
- व्हायाडक्ट आणि पूल: 124 कि.मी.
- पूल आणि क्रॉसिंग: 36 (12 स्टील पुलांसह)
- स्टेशन: 3 म्हणजेच ठाणे, विरार आणि बोईसर (सर्व एलिव्हेटेड)
- डोंगराळ बोगदे: 6
- नदी पूल: उल्हास नदी, वैतरणा आणि जगनी, एमएएचएसआर प्रकल्पाचा सर्वात लांब पूल (2.28 कि.मी.) वैतरणा नदीवर बांधला जाईल

