Published Date
135 किमी लांबीचे नागरी बांधकाम पॅकेज ज्यामध्ये मार्गात खालील विशेष वास्तू बांधल्या जात आहेत. गुजरात राज्यात 237 किमी लांबीच्या पॅकेज सी 4 नंतर बुलेट ट्रेन पॅकेजसाठी हे दुसरे सर्वात मोठे नागरी पॅकेज आहे.
- मेनलाइनची एकूण लांबी : 135.45 किमी (महाराष्ट्र -गुजरात सीमेवरील शिळफाटा ते झरोली गावादरम्यान)
- व्हायाडक्ट आणि पूल: 124.027 किमी
- अर्थ स्ट्रक्चर: 5.361 कि.मी
- पूल आणि क्रॉसिंग: 12 स्टील पुलांसह 36 ठिकाणी
- स्थानके : 3 ठिकाणी. ठाणे, विरार आणि बोईसर
- डोंगरी बोगदे: 7
- मुख्य नदी पूल : उल्हास नदी, वैतरणा व जगणी
आजपर्यंतची प्रगती
- अलाइनमेंटमध्ये अनेक ठिकाणी पियर फाऊंडेशन आणि पियरचे काम सुरू आहे
- तिन्ही स्थानकांवर पायाभरणीचे काम सुरू झाले आहे, पायाभरणी सुरू करणारे बोईसर स्थानक पहिले आहे
- तीन कास्टिंग यार्ड, सेगमेंटल कास्टिंगसाठी 2 आणि फुल स्पॅन बॉक्स गर्डरसाठी एक (40 मीटर लांब) आधीच कार्यान्वित आहेत
- डहाणूजवळील कास्टिंग यार्डमध्ये सुमारे 970 मेट्रिक टन वजनाचा पहिला फुल स्पॅन बॉक्स गर्डर नुकताच टाकण्यात आला आहे
- वैतरणा, उल्हास नदी आणि देसई खाडीवरील तात्पुरत्या प्रवेश पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या तात्पुरत्या पुलांचा वापर नदी पूल बांधणीदरम्यान मनुष्यबळ व यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीसाठी केला जाणार आहे

