• मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल (एमएएचएसआर) प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील प्रगतीच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून, एनएचएसआरसीएलने एमडी / एनएचएसआरसीएल, एनएचएसआरसीएलचे संचालक, वरिष्ठ अधिकारी आणि एमएलआयटी जपान (भूमी मंत्रालय, इन्फ्रास्ट्रक्चर, ट्रान्सपोर्ट अँड टुरिझम) जीआयसीए (जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी), जपानी दूतावास आणि जपान एचएसआर इलेक्ट्रिक इंजिनीअरिंग कंपनीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईडब्ल्यू-1 पॅकेज अंतर्गत इलेक्ट्रिकल कामे करण्यासाठी मेसर्स सोजिट्झ अँड एल अँड टी कन्सोर्टियमशी करारावर स्वाक्षरी केली आहे.
• कंत्राटी करारावर स्वाक्षरी केल्याने जपानी शिंकानसेन तंत्रज्ञानावर आधारित भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन ऑपरेशनसाठी वाढीव सहकार्याचा एक बेंचमार्क स्थापित झाला आहे
• ईडब्ल्यू-1 कामांमध्ये जपानी शिंकानसेन सिस्टम-आधारित ट्रॅक्शन पॉवर पुरवठ्याचा समावेश असलेल्या 320 किमी / तासापर्यंतच्या वेगासाठी उपयुक्त 2 बाय 25 केव्ही विद्युतीकरण प्रणालींचे डिझाइन, उत्पादन, पुरवठा, बांधकाम, स्थापना, चाचणी आणि कमिशनिंग समाविष्ट आहे
त्यामध्ये ट्रॅक्शन सबस्टेशन (टीएसएस) – संख्या 14 , सेक्शनिंग पोस्ट (एसपी)- संख्या 11, सब-सेक्शनिंग पोस्ट (एसएसपी)- संख्या 19, आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर पोस्ट (एटीपी)- संख्या 1, ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई): मेनलाइन: 508 मार्ग किमी, डबल लाइन आणि 3 डेपो: सुरत, साबरमती आणि ठाणे, 11 केव्ही बॅकबोन सह विस्तृत वितरण प्रणाली आणि 125 पेक्षा जास्त उपकेंद्रे आणि संबंधित नागरी उपयोगिता इमारती, सुमारे 508 किलोमीटरच्या संपूर्ण एमएएचएसआर कॉरिडॉरसाठी प्रशिक्षण संस्था उपकरणे इ.

