Published Date
मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरने गुजरात राज्यात (352 किमी) 100 किलोमीटर पिलरचे काम पूर्ण करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
इतर तपशील खालीलप्रमाणे आहेत:
- गुजरात राज्यातील प्रकल्प अद्यतन
- 100 किलोमीटरच्या पट्ट्यात पिलर बांधले गेले आहेत.
- 193 किलोमीटर लांबीमध्ये पाइल कास्टिंग झाले आहे.
- 9.2 किलोमीटर लांबीचा व्हायाडक्ट पूर्ण झाला आहे, ज्यात नवसारीजवळ 2.5 किलोमीटरचा सततचा व्हायाडक्ट आणि वेगवेगळ्या ठिकाणी उभारलेले 6.7 किलोमीटरचे बांधकाम समाविष्ट आहे.
- गर्डर कास्टिंग - 22.7 किलोमीटरचे गर्डर कास्ट केले गेले आहेत आणि 9.2 किलोमीटरचे गर्डर बसवले गेले आहेत.
- गुजरात आणि डीएनएचच्या 8 जिल्ह्यांतून जाणाऱ्या संपूर्ण मार्गावर बांधकाम कामाला पूर्ण वेग आला आहे.
- वापी ते साबरमती या 8 एचएसआर स्टेशन्सचे काम विविध टप्प्यांवर आहे.
- नर्मदा, तापी, माही आणि साबरमती यांसारख्या महत्त्वाच्या नद्यांवरील पुलाचे काम प्रगतीपथावर आहे.
- जमीन अधिग्रहणाची स्थिती:
- एकूण: - 97.82%
- गुजरात: - 98.87%
- डीएनएच: - 100%
- महाराष्ट्र: - 95.45%
- महाराष्ट्रातील जमिनीचा ताबा घेण्याची स्थिती 73.83% आहे.

