मुंबई अहमदाबाद एचएसआर कॉरिडॉर (एमएएचएसआर) च्या टी-2 पॅकेजसाठी (ज्यात वापी आणि वडोदरा दरम्यानच्या 237 किमी अंतराचा समावेश आहे) भारतीय अभियंते आणि वर्क लीडर्ससाठी हाय-स्पीड रेल ट्रॅक प्रणालीचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.
ट्रॅक बांधकाम कामांसाठी साइटवर केवळ प्रशिक्षित आणि प्रमाणित अभियंते/वर्क लीडर्सद्वारेच काम केले जाईल. यामुळे जपानी एचएसआर ट्रॅक प्रणालीच्या 'तंत्रज्ञान हस्तांतरण' मध्ये देखील मदत मिळेल.
जपानी शिंकानसेन एचएसआर मध्ये वापरली जाणारी गिट्टी-रहित स्लैब ट्रॅक प्रणाली (जे स्लैब ट्रॅक प्रणाली म्हणून लोकप्रिय) भारताच्या पहिल्या एचएसआर प्रकल्पासाठी वापरली जाईल. संबंधित क्षेत्रात जपानी तज्ञांच्या माध्यमातून जेआयसीए (JICA) (एमएएचएसआर प्रकल्पाची निधी पुरवठा करणारी संस्था) नामांकित जेएआरटीएस (JARTS) (जपानची ना-नफा संस्था) द्वारे प्रशिक्षण दिले जाईल.
प्रशिक्षण कार्यक्रमात ट्रॅक कार्यांच्या सर्व पैलूंचा समावेश असलेले 15 विविध अभ्यासक्रम समाविष्ट केले आहेत, ज्यात साइट व्यवस्थापकांसाठी प्रशिक्षण, ट्रॅक स्लैब बांधकाम, आरसी ट्रॅक बेड (RC Track Bed) बांधकाम, रेफरन्स पिन सर्व्हे (Reference Pin Survey) आणि डेटा विश्लेषण, स्लैब ट्रॅक इंस्टॉलेशन, सीएएम इंस्टॉलेशन (CAM Installation), रेल वेल्ड फिनिशिंग, रेल्वेचे एनक्लोज्ड आर्क वेल्डिंग (Enclosed Arc Welding) आणि टर्नआउट इंस्टॉलेशन (Turnout Installation) इत्यादींचा समावेश आहे.
प्रकल्पात सुमारे 1000 अभियंते/वर्क लीडर्स/टेक्निशियन्सना प्रशिक्षित करण्याची योजना आहे. यासाठी सुरत डेपोमध्ये विशेषतः 3 (तीन) ट्रेल लाईन तयार करण्यात आल्या आहेत.
जपानी ट्रॅक प्रणाली जगात अद्वितीय आहे आणि ती टाकण्यासाठी उच्च स्तरावरील कौशल्याची आवश्यकता आहे. ट्रॅक एचएसआर प्रणालीचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि तो अत्यंत उच्च स्तराच्या अचूकतेने टाकला गेला पाहिजे. प्रशिक्षण कार्यक्रमात वीस (20) जपानी तज्ञ भारतीय अभियंते, पर्यवेक्षक आणि तंत्रज्ञांना गहन प्रशिक्षण देण्यासोबतच त्यांच्या कौशल्याला प्रमाणित करतील.

