Published Date
8 जानेवारी 2024 पर्यंत प्रकल्पाची स्थिती
- प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
- सर्व नागरी कंत्राटे गुजरात आणि महाराष्ट्रासाठी देण्यात आली आहेत.
- 120.4 किमी गर्डर लाँच करण्यात आले असून 271 किमी पियर कास्टिंग पूर्ण झाले आहे
- गुजरात, DNH आणि महाराष्ट्रात 100% भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे
- जपानच्या शिंकानसेनमध्ये वापरल्या जाणाऱ्या एमएएचएसआर कॉरिडॉर ट्रॅक सिस्टीमसाठी पहिले प्रबलित काँक्रीट (आरसी) ट्रॅक बेड टाकण्याचे काम सुरत आणि आणंद येथे सुरू झाले आहे. भारतात पहिल्यांदाच जे-स्लॅब गिट्टीविरहित ट्रॅक सिस्टिमचा वापर केला जात आहे.
- गुजरातमधील वलसाडमधील झारोली गावाजवळील 350 मीटर लांबी आणि 12.6 मीटर व्यासाचा पहिला डोंगर बोगदा अवघ्या 10 महिन्यांत पूर्ण करून उल्लेखनीय टप्पा गाठला.
- गुजरातमधील सुरत येथे एनएच 53 वर 70 मीटर लांबीचा आणि 673 मेट्रिक टन वजनाचा पहिला स्टील पूल उभारण्यात आला. 28 पैकी 16 पूल तयार होण्याच्या विविध टप्प्यात आहेत.
- पार (वलसाड जिल्हा), पूर्णा (नवसारी जिल्हा), मिंधोला (नवसारी जिल्हा), अंबिका (नवसारी जिल्हा), औरंगा (वलसाड जिल्हा) आणि वेंगनिया (नवसारी जिल्हा) या एमएएचएसआर कॉरिडॉरवरील एकूण 24 नदी पुलांपैकी सहा नद्यांवरील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. नर्मदा, ताप्ती, माही आणि साबरमती या नद्यांचे काम प्रगतीपथावर आहे.
- ऑपरेशनदरम्यान ट्रेन आणि सिव्हिल स्ट्रक्चर्सद्वारे निर्माण होणारा आवाज कमी करण्यासाठी, वायडक्टच्या दोन्ही बाजूला ध्वनी अडथळे उभे केले जात आहेत
- महाराष्ट्रातील बीकेसी ते शिळफाटा दरम्यान 21 किमी लांबीच्या बोगद्याचा एक भाग असलेल्या भारतातील पहिल्या 7 किमीच्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याच्या कामाची सुरुवात
- मुंबई एचएसआर स्थानकाच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू करण्यात आले आहे.
- भूसंपादनाची स्थिती :
- एकंदरीत :- 100 %
- गुजरात :- 100 %
- डीएनएच:- 100 %
- महाराष्ट्र :- 100 %
- गुजरातमधील कामांची प्रगती:
- 3.1 वायडक्ट: एकूण- 352 किमी
- - पाइल + ओपन फाउंडेशन: 343.9 किमी
- - फाउंडेशन: 294.5 किमी
- - पियर (स्थानकांसह): 271 किमी
- - पियर (स्थानके वगळून): 268.5 कि.मी.
- - गर्डरची संख्या : 3797
- - गर्डर कास्टिंग: 152 किमी
- - वायडक्ट (गर्डर लाँचिंग): 120.4 किमी
- 3.2 विशेष पूल
- राष्ट्रीय व राज्य महामार्ग, सिंचन कालवे आणि रेल्वेवरील 28 क्रॉसिंग (गुजरातमध्ये 17, महाराष्ट्रात 11) लांब पल्ल्याच्या स्टील स्ट्रक्चरद्वारे बांधले जातील.
- 3.3 स्थानके आणि डेपो
-
गुजरात
- सर्व 8 एचएसआर स्थानकांचे (वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, आणंद, वडोदरा, अहमदाबाद आणि साबरमती) काम बांधकामाच्या विविध टप्प्यात आहे.
- -सर्व 8 एचएसआर स्थानकांच्या पायाभरणीचे काम पूर्ण
- - वापी स्टेशन - रेल्वे लेव्हल स्लॅब (200 मीटर) पूर्ण.
- - बिलिमोरा स्टेशन - 288 मीटर रेल्वे लेव्हल स्लॅबचे कास्टिंग पूर्ण झाले
- - सुरत स्टेशन – कॉनकोर्स स्लॅब आणि रेल्वे लेव्हल स्लॅब (450 मीटर) पूर्ण झाले. प्लॅटफॉर्म लेव्हल स्लॅबचे कास्टिंग सुरू झाले असून 557 मीटर कास्टिंग झाले आहे.
- - आनंद स्टेशन – कॉनकोर्स स्लॅब आणि रेल्वे लेव्हल स्लॅब (425 मीटर) पूर्ण झाले. 124 मीटर प्लॅटफॉर्म लेव्हल स्लॅब पूर्ण.
- - अहमदाबाद स्टेशन – कॉनकोर्स स्लॅब (435 मीटर) पूर्ण झाला.
- - सुरत डेपो – फाऊंडेशन आणि सुपर स्ट्रक्चरची कामे पूर्ण झाली.
- - साबरमती डेपो – अर्थवर्क पूर्ण; ओएचई फाऊंडेशनचे काम प्रगतीपथावर आहे.
महाराष्ट्र
- महाराष्ट्रातील मुंबई एचएसआर स्थानकाचे काम सुरू झाले. 99% सेकेंट पाईल पूर्ण झाला. 104,421 क्युम खोदकाम झाले आहे. अँकर फिक्सिंगचे काम सुरू झाले असून त्यामुळे दुसर्या लेव्हलसाठी खोदकामाची सोय होणार आहे.
- महाराष्ट्रातील तीन स्थानकांसह (बोईसर, विरार आणि ठाणे) उर्वरित अलाइनमेंटचे काम प्रगतीपथावर आहे.
- 3.1 वायडक्ट: एकूण- 352 किमी