ज्या शहरांत मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण करणारे प्रकल्प उभे राहतात त्यां शहरांची वाढ आणि प्रगती ठरलेलीच असते. परंतु, कधीकधी, प्रकल्पांतर्गत कामे म्हणजे भांध्काम आणि इतर यांचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. एमएएचएसआर कॉरिडॉरच्या बाबतीत, जिथून उच्च संरेखन स्पीड ट्रेन धावेल अशा उत्तर-पश्चिम महाराष्ट्रातील वन्यजीवांसाचे काही प्रमुख अधिवास जसे की-संजय गांधी राष्ट्रीय)उद्यान (एसजीएनपी), तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य (टीडब्ल्यूएस) राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले आहेत ज्यामुळे त्यांच्यावर या प्रकल्पाचा विपरित परिणाम होणार नाही
मुंबईच्या जवळ असल्यामुळे, या जागेची येऊ घातलेल्या तीन प्रमुख पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी निवड करण्यात आली आहे- एमएएचएसआर कॉरिडॉर, दिवा-पनवेल रेल्वे लाइन, DFCCIL ट्रॅक आणि एमएमआरडीए ने नियोजित भविष्यातील एक्सप्रेस वे- एसजीएनपी आणि टीडब्ल्यूएस दरम्यान 80-100 मीटरचा मार्ग.
जरी या परिसराच्या आसपासच्या शहरांमध्ये राहणा-या लोकांसाठी होणारा हा विकास ही एक चांगली बातमी असली तरी, मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बांधकामामुळे वन्यजीवांच्या अधिवासावर गंभीर परिणाम होईल. विविध भागधारकांमध्ये अनेक वेळा चर्चा घडल्यानंतर, अंडरपास आणि ओव्हरपाससह - वन्यजीव कॉरिडॉर तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे परिणामग्रस्त भागात वन्यजीवांचा वावर सुरळीत होईल. 30 मीटर रुंदीचा हा ओव्हरपास विद्यमान दिवा-वसई लाईन, प्रस्तावित डीएफसीसीआयएल लाइन आणि पीडब्ल्यूडी रोड वर येईल आणि एमएएचएसआर लाइन आणि एमएमसी व्हायाडक्टच्या खालून जाईल. त्याची रचना आजूबाजूच्या परिसरातील नैसर्गिक वनस्पतींशी मिळतीजुळती असेल आणि प्राण्यांना नेहमीच्या अधिवासाचा अनुभव मिळण्यासाठी खडक,लाॅग्स आणि पाणवठे यांसारखे घटक निर्माण केले जातील.
डब्लूओपी एंट्री आणि एक्झिट्स पूर्णपणे एसजीएनपी आणि टीडब्ल्यूएस हद्दीत असतील ज्यात पुरेसे फनेलिंग आणि कमीतकमी 3 मीटर उंचीचे कुंपण असेल ज्यामध्ये अतिरिक्त वरचा भाग (0.5 मीटर) आतल्या बाजूला वाकलेला असेल जेणेकरून वन्यजीव त्यावर उडी मारू शकणार नाहीत. परिसरात प्रखर प्रकाशाच्या वापरावर निर्बंध लादले जातील आणि उच्च दर्जाचे ध्वनी अडथळे उभे केले जातील जेणेकरून आवाजाची पातळी जनावरांसाठी सुरक्षित अशा मर्यादेत राहील याची खात्री होईल.
वन्यजीव कॉरिडॉर/डब्ल्यूओपीमध्ये संपूर्ण विभागासाठी प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या बाजूने नेट कनेक्टेड सीसीटीव्हीद्वारे पाळत ठेवण्याच्या तरतुदी असतील ज्यामध्ये संबंधित दक्षता विभागात नियंत्रण कक्षांकडून देखरेख यंत्रणा असेल.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य दरम्यान बांधण्यात आलेल्या प्रस्तावित वन्यजीव मार्ग कॉरिडॉरला दिनांक 03/02/2021 च्या पत्राद्वारे प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य यांनी मंजुरी दिली आहे. मंजूर केलेली योजना अंमलबजावणी करणारी एजन्सी, DFCCIL कडे पाठवण्यात आली आहे.
वन्यजीव प्राणी कॉरिडॉरचे ग्राफिकल चित्
वन्यजीव प्राणी कॉरिडॉरचे समोरून दृश्य