पूर्णपणे स्वयंचलित सुविधा एम.ए.एच.एस.आर. कॉरिडॉरसाठी 116 किमी दुहेरी मार्गाच्या हाय स्पीड रेल्वे ट्रॅकसाठी ट्रॅक स्लॅब तयार करेल.
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी बॅलेस्टलेस ट्रॅकच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या ट्रॅक स्लॅबच्या उत्पादनासाठी नवीन ट्रॅक स्लॅब उत्पादन सुविधा (टी.एस.एम.एफ.) आज गुजरात राज्यातील आनंद येथे सुरु करण्यात आली.
ही सुविधा 1 लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेली आहे आणि एम.ए.एच.एस.आर. प्रकल्पासाठी 45,000 प्रीकास्ट ट्रॅक स्लॅबच्या निर्मितीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. नागरी काम सुरू झाल्यापासून आठ महिन्यांत संपूर्ण सुविधा बांधण्यात आली आहे. सुविधेमध्ये 60 उच्च-परिशुद्धता मोल्ड्स खरेदी आणि स्थापित केले गेले आहेत जे दररोज 60 ट्रॅक स्लॅब तयार करू शकतात. प्रति ट्रॅक किलोमीटरसाठी अंदाजे 200 ट्रॅक स्लॅब आवश्यक आहेत. सीमलेस ट्रॅक इन्स्टॉलेशनसाठी सुविधा 9000 ट्रॅक स्लॅब पर्यंत साठवू शकते.
ट्रॅक स्लॅब निर्मिती सुविधा कंक्रीट वितरण प्रणालीसह पूर्णपणे स्वयंचलित आहे. स्लॅबच्या उत्पादनास समर्थन देण्यासाठी विविध सहाय्यक सुविधा आहेत जसे की पूर्णपणे स्वयंचलित रीबार प्रोसेसिंग मशीन, पिंजरा तयार करण्यासाठी रेबार यार्ड, आरओ प्लांट, बॉयलर प्लांट, क्युरिंग पॉन्ड्स, इलेक्ट्रिक ओव्हरहेड ट्रॅव्हलिंग (ई.ओ.टी.) क्रेन, गॅन्ट्री क्रेन इ. प्रोडक्शन शेड, रेबार शेड, स्टोअर यांसारख्या प्रमुख सुविधांवरील ईओटी आणि गॅन्ट्री ट्रॅक स्लॅब घटकांची यांत्रिक हाताळणी सुनिश्चित करतात.
उत्पादन सुरू होण्यापूर्वी एक प्रशिक्षण आणि प्रमाणन अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये जपानी तज्ञांनी (जपानमधील टी अँड सी एजन्सी जे.ए.आर.टी.एस. द्वारे एकत्रित) भारतीय अभियंत्यांना जपानमध्ये अवलंबलेल्या पद्धतींवर आधारित प्रशिक्षण दिले.
गुजरातच्या एम.ए.एच.एस.आर. कॉरिडॉरच्या 236 किमी लांबीच्या ट्रॅक स्लॅबच्या बांधकामासाठी गुजरातमध्ये सुरत जिल्ह्याजवळील किम गावात आणखी एक ट्रॅक स्लॅब निर्मिती सुविधा तयार केली जात आहे.