प्रवाशांच्या सोयीसाठी, बुलेट ट्रेन कॉरिडॉरवरील सर्व स्टेशन्स आधुनिक आणि प्रगत सुविधा तसेच माहिती प्रणालींनी सुसज्ज असतील. स्टेशन्सवर तिकीट काउंटर, वेटिंग एरिया, बिझनेस-क्लास लाउंज, नर्सरी, टॉयलेट, माहिती बूथ, रिटेल सेंटर इत्यादी सर्व सुविधा उपलब्ध असतील.
पहिला एस्केलेटरचा संच (2 नग), आनंद बुलेट ट्रेन स्टेशनवर बसवला जात आहे, ज्याचा वापर ग्राउंड स्तरावरून कॉन्कोर्स स्तरापर्यंत केला जाईल.
कॉरिडॉरवरील सर्व 12 स्टेशन्सवर एकूण 90 ऊर्जा-कार्यक्षम एस्केलेटर बसवले जातील. (गुजरातच्या 8 स्टेशन्सवर 48 आणि महाराष्ट्रातील 4 स्टेशन्सवर 42)
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, आपत्कालीन स्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी एस्केलेटरवर इमर्जन्सी स्टॉप बटण, एस्केलेटरच्या रेलिंगमध्ये बोटे चुकून अडकण्यापासून वाचवण्यासाठी हँडरेल फिंगर गार्ड सुरक्षा उपकरण, कपडे आणि इतर वस्तू एस्केलेटरमध्ये अडकण्यापासून वाचवण्यासाठी ड्रेस गार्ड (ब्रश प्रकाराचे उपकरण) इत्यादी बसवले जातील.
गुजरातमध्ये बुलेट ट्रेन स्टेशन्सवर बसवण्यात येणाऱ्या एस्केलेटरचा तपशील:
| बुलेट ट्रेन स्टेशन | एस्केलेटरची संख्या |
|---|---|
| साबरमती | 12 (08 प्लॅटफॉर्मवरून कॉनकोर्सकडे आणि 04 कॉनकोर्सवरून पहिल्या मजल्याकडे) |
| अहमदाबाद | 8 (प्लॅटफॉर्मवरून कॉनकोर्सकडे) |
| आणंद | 6 (ग्राउंडवरून कॉनकोर्सकडे 02 आणि कॉनकोर्सवरून प्लॅटफॉर्म स्तराकडे 04) |
| वडोदरा | 4 (02 ग्राउंडवरून कॉनकोर्सकडे आणि 02 कॉनकोर्सवरून प्लॅटफॉर्मकडे) |
| भरुच | 4 (ग्राउंडवरून प्लॅटफॉर्म स्तराकडे) |
| सुरत | 6 (कॉनकोर्सवरून ग्राउंडकडे 02 आणि प्लॅटफॉर्मवरून कॉनकोर्सकडे 04) * दोन एस्केलेटर साइटवर पोहोचले आहेत |
| बिलिमोरा | 4 (ग्राउंडवरून प्लॅटफॉर्म स्तराकडे) |
| वापी | 4 (ग्राउंडवरून प्लॅटफॉर्म स्तराकडे) |

