Published Date
हा गुजरातमध्ये बांधल्या गेलेल्या 20 नदी पुलांपैकी 11 वा नदी पूल आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील कावेरी नदीवर पुलाचे बांधकाम 25 ऑगस्ट 2024 रोजी पूर्ण झाले.
पुलाची मुख्य वैशिष्ट्ये:
- लांबी: 120 मीटर
- 3 फुल स्पॅन गर्डर (प्रत्येकी 40 मीटर) पासून बनलेला आहे.
- पिलर्सची उंची - 13 मीटर ते 21 मीटर आहे.
- यात 4 मीटर व्यासाचा एक (01) आणि 5 मीटर व्यासाचे तीन (03) गोलाकार पिलर्स आहेत.
- हा पूल वापी आणि बिलिमोरा बुलेट ट्रेन स्टेशनच्या दरम्यान आहे. या दोन स्टेशनच्या दरम्यान कोळक, पार आणि औरंगा नदीवर देखील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
- ही नदी अंबिका नदीच्या उपनद्यांपैकी एक आहे, जी महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून असलेल्या गुजरात राज्यातील वंसदा तालुक्याच्या डोंगरातून उगम पावते.
- कावेरी नदी, वापी बुलेट ट्रेन स्टेशनपासून 46 कि.मी. आणि बिलिमोरा बुलेट ट्रेन स्टेशनपासून 04 कि.मी. अंतरावर आहे.
- इतर नदी पुलांचे बांधकाम, पार (वलसाड जिल्हा), पूर्णा (नवसारी जिल्हा), मिंधोला (नवसारी जिल्हा), अंबिका (नवसारी जिल्हा), औरंगा (वलसाड जिल्हा), वेंगानिया (नवसारी जिल्हा), मोहर (खेडा जिल्हा), धाधर (वडोदरा जिल्हा), कोळक (वलसाड जिल्हा) आणि वात्रक नदी (खेडा जिल्हा) वर पूर्ण झाले आहे.

