Skip to main content

‘मेक इन इंडिया’ अभियानामुळे अशाप्रकारे अति-वेगवान रेल्वे प्रकल्पाला मिळत आहे प्रोत्साहन

‘मेक इन इंडिया’ अभियानामुळे अशाप्रकारे अति-वेगवान रेल्वे प्रकल्पाला मिळत आहे प्रोत्साहन

आशिया खंडातील वेगाने वाढत जाणारी द्विपक्षीय भागीदारी म्हणून मान्यता पावलेल्या भारत-जपान यांच्यातील संबंध आता बरेच परिपक्व झाले आहेत. याच भागीदारीच्या बळावर भारतातील पहिली अति-वेगवान रेल्वे किंवा बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी दोन्ही देशांनी हातमिळवणी केली आहे आणि ही भागीदारी भविष्यात आणखी बळकट होणार आहे. मुंबई ते अहमदाबाद हा 508 किलोमीटर अंतराच्या अति-वेगवान रेल्वेमार्गावर 12 स्थानकं असणार आहेत. बीकेसी (मुंबई)-ठाणे-विरार-बोईसर-वापी-बिलिमोरा-सुरत-भडोच-वडोदरा-आणंद-अहमदाबाद-साबरमती अशी या स्थानकांची नावं आहेत. या भागीदारीमुळे भारतीय उद्योगांच्या हृदयात वसलेल्या आणखी एका कारणाला प्रोत्साहन मिळत आहे ते म्हणजे ‘मेक इन इंडिया’ अभियानाच्या माध्यमातून भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणं.

image1 blog_0

 

मेक इन इंडिया काय आहे?

राष्ट्रउभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये मेक इन इंडिया या अभियानाला सुरुवात केली. भारताला जागतिक स्तरावरचं डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी सुरू केलेल्या या अभियानाला भारतातील अगणित भागधारक व भागीदारांनी लगेचच उचलून धरलं त्यातूनच जगभरातील संभाव्य भागीदार आणि गुंतवणुकदारांना भारतात गुंतवणुकीचं आमंत्रण दिलं गेलं. त्याचाच परिणाम म्हणून अल्पावधीतच गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, संशोधनाला चालना देण्यासाठी, कौशल्य विकसनासाठी, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीचे (आयपी) रक्षण करण्यासाठी आणि देशात सर्वोत्तम पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी या संकल्पनेचा उपयोग झाला. रेल्वे, संरक्षण, विमा आणि वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांत झालेली अभूतपूर्व परकीय थेट गुंतवणूक हा या अभियानाच्या यशाचा एक महत्त्वाचा परिणाम आहे. भारताच्या 2 ट्रिलियन अमेरिकी डॉलरच्या अर्थव्यवस्थेतील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा वाटा 25 टक्क्यांपर्यंत नेणे आणि 2022 पर्यंत देशात 10 कोटी नोकऱ्या निर्माण करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. ‘मेक इन इंडि’याबद्दल अधिक माहितीसाठी www.makeinindia.com आणि डिपार्टमेंट फॉर इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशन विभागाच्या (DIPP) वेबसाइटला, https://dipp.gov.in/ भेट द्या.

एमएएचएसआर प्रकल्पात ‘मेक इन इंडिया’ची भूमिका

मुंबई- अहमदाबाद हाय स्पीड रेल (एमएएचएसआर) प्रकल्पाच्या कराराचा भाग म्हणून भारत ‘मेक इन इंडिया’ आणि ‘तंत्रज्ञानाचे हस्तांतरण (Transfer of Technology)’ या दोन महत्त्वपूर्ण अभियानांची जाहिरात करण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे.

जपानी तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुटे भाग तयार करण्यात भारताचं असलेलं प्रावीण्य यांच्या एकत्रीकरणातून या प्रकल्पाला बळ मिळणार आहे. या प्रकल्पातील तंत्रज्ञान हस्तांतरणाचा (ToT) भाग म्हणून त्याला लागणारे सुटे भाग भारतात तयार केले जाणार आहेत त्यासाठी या भागांच्या निर्मितीसाठी आवश्यक ब्लूप्रिंट आणि त्याची पद्धत जपानी अधिकारी भारतातील समकक्ष अधिकाऱ्यांना सांगणार आहेत. त्यानंतर करारानुसार ‘मेक इन इंडिया’ अभियानाअंतर्गत या प्रकल्पाला लागणारे सुटे भाग भारतात निर्माण केले जाणार आहेत. या दोन अभियानांच्या प्रमोशनच्या माध्यमातून देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा भारताचा प्रयत्न असून, त्यातून नव्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत तसेच सध्याच्या मनुष्यबळाला आपल्या कौशल्यांत वृद्धी करण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर त्या उद्योगांशी संबंधित इतर (स्टील, सिमेंट, इलेक्ट्रिक सुटे भाग आणि पायाभूत सुविधा इ.) क्षेत्रांनाही चालना मिळणार आहे. त्याचबरोबर जपान वापरत असलेल्या नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी छोटासा आधार भारताला मिळणार आहे.

आकडेवारीचाच विचार केला तर हा प्रकल्प विकासाला चालना देणार असून पायाभूत सुविधा निर्मितीच्या टप्प्यातच या प्रकल्पामुळे 20000 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत त्यापैकी 4000 जणांना मेंटेनन्स आणि ऑपेरशन्स या विभागात नोकरी मिळण्याचा अंदाज आहेत तर इतर कामांच्या माध्यमातून उर्वरित 20000 नोकऱ्या उत्पन्न होतील असा अंदाज आहे.

केवळ एवढंच नाही तर या प्रकल्पामुळे या रेल्वेमार्गावर येणाऱ्या भागात सामाजिक विकासालाही चालना मिळणार आहे. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पाच्या मुख्य परिणामांतून झिरपत जाऊन जो विकास होणार आहे तोही महत्त्वाचा आहे ज्यामुळे देशभरात उत्पादनाचे प्रकल्प उभे राहतील त्यांच्या माध्यमातूनच दळणवळणाची केंद्र, नव्या टाउनशीप, औद्योगिक वसाहती आणि विकासाच्या इतरही अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

या प्रकल्पामध्ये ‘मेक इन इंडिया’अभियानाचा अवलंब कसा केला जात आहे.

कोणत्याही प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी चर्चा, सहकार्य, कल्पनांची देवाण-घेवाण आणि अंमलबजावणी याला अनन्यसाधारण महत्त्व असते. तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत आघाडीवर आहे तसंच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इंजिनीअरिंग व सुविधांची उभारणी करण्यासाठी योग्य नियोजनाच्या माध्यमातून आवश्यक असलेली उच्च कार्यक्षमतेची इकोसिस्टीम उभी करण्यासाठी भारत कोणतीही कसर सोडत नाही हे मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल (एमएएचएसआर) प्रकल्पातून जगाला दाखवून देण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे. ‘मेक इन इंडिया’ अभियानाची उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिने एमएएचएसआर या प्रकल्पातील मार्गदर्शक तत्वांच्या आधारे सुरू केलेल्या काही महत्त्वाच्या प्रयत्नांची माहिती इथे दिली आहे.

 • एमएएचएसआर या प्रकल्पाअंतर्गत ‘मेक इन इंडिया’ अभियानाची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांची अमंलबजावणी करण्याच्या दृष्टिने डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशन (DIPP) आणि जपान एक्स्टर्नल ट्रेड ऑर्गनायझेशन (JETRO) या मुख्य भागधारकांशी वेळोवेळी चर्चा करण्यात आली आहे.
 • ‘मेक इन इंडिया’शी संबंधित सब-सिस्टिम्स व आवश्यक घटकांची गरज जाणून घेऊन आवश्यक तेव्हा तातडीने कार्यवाही करण्यात आली असून त्याचसंबंधाने ट्रॅक, सिव्हिल, इलेक्ट्रिकल व एस अँड टी तसंच रोलिंग स्टॉक या चार महत्त्वाच्या विभागांच्या वेळोवेळी आणि नियमितपणे बैठका घेऊन चर्चा केली जाते. भारतीय औद्योगिक क्षेत्र, जपानी औद्योगिक क्षेत्र, डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशन (DIPP), एनएचएसआरसीएल आणि जपान एक्स्टर्नल ट्रेड ऑर्गनायझेशन (JETRO) यांतील वरिष्ठ प्रतिनिधी या चार विभागांत कार्यरत आहेत.


करारात नमूद केल्याप्रमाणे ‘मेक इन इंडिया’ हा घटक आणि भारतीय व जपानी कंपन्यांच्या सहाकार्याचे प्रसिद्धी करण्याच्या दृष्टिने केल्या जाणाऱ्या चर्चा या प्रामुख्याने खालील 3 प्रकारांत मोडतात :
 

sVF9CVXhmS0ENhb6QP0cXJA22
 1. सब ग्रुप मीटिंग्ज - डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशन (DIPP), रेल्वे मंत्रालय, राष्ट्रीय हाय स्पीड रेल्वे प्राधिकरण लिमिटेड (NHSRCL), MLIT, जपान एक्स्टर्नल ट्रेड ऑर्गनायझेशन (JETRO), जपानी दूतावास, जपान रेल्वे ईस्ट (JRE), या संस्थांचे प्रतिनिधी या बैठकांना उपस्थित असतात त्याचबरोबर कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII), फेडरेशन ऑफ इंडियन चेबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) आणि द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (ASSOCHAM) यासारख्या भारतीय औद्योगिक क्षेत्रातील संघटनांचे प्रतिनिधीही या बैठकांना उपस्थित असतात.
 2. वर्कशॉप्स: या प्रकल्पात सहभागी असलेल्या विविध घटकांसाठी नियमितपणे भारतात आणि जपानमध्ये वर्कशॉप्सचे आयोजन केले जाते.  सध्याच्या भागीदारांपैकी सर्वांनी या वर्कशॉपमध्ये सहभागी व्हावं तसंच  संभाव्य गुंतवणुकदारांना व सहभागासाठी उत्सुक असलेल्या फर्म्सना आमंत्रण द्यावं यासाठी या वर्कशॉप्सची खूप आधीपासून जाहिरात केली जाते. भारतीय जपानी फर्ममध्ये संवादासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावं म्हणून या वर्कशॉप्सनंतर B2B मीटिंग्ज आणि चर्चासत्रांचंही आयोजन केलं जातं. नुकत्याच टोकियोमध्ये आयोजित वर्कशॉपनंतर भारतीय फर्ममधील प्रतिनिधींनी जपानमधील फर्मला भेट दिली.
 3. टास्क फोर्स मीटिंग्ज: आधीच अंमलबजावणी झालेल्या नियोजनाच्या प्रगतीचा आढावा घेणं आणि प्रकल्पातील पुढच्या कामाबद्दल चर्चा करणं हा या बैठकांचा उद्देश आहे. DIPP मध्ये नुकत्याच झालेल्या एका बैठकीत सब ग्रुप्सच्या मीटिंग्ज व वर्कशॉप्सच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसंच भविष्यातील कामाच्या नियोजनाची निश्चिती करण्यात आली. या आढावा बैठकांना DIPP, रेल्वे मंत्रालय, NHSRCL, भू संपादन, पायाभूत सुविधा, दळणवळण आणि पर्यटन मंत्रालय (MLIT), JETRO,जपानी दूतावास,आणि JRE चे प्रतिनिधी उपस्थित होते.


या वर्कशॉप आणि मीटिंग्जच्या माध्यमातून भारत आणि जपानमधील कंपन्या, उत्पादक आणि नवउद्योजकांपर्यंत पोहोचून MAHSR प्रकल्प दोन्ही देशांत सकारात्मक व्यापार-करार कार्यान्वित करत आहे व त्यातूनच भारतात तांत्रिक अद्ययावततेसाठीची मोठी क्षितिजेही निर्माण करत आहे.

मेक इन इंडिया अंतर्गत द्विपक्षीय करारानुसार HSR प्रकल्पातील विविध घटकांचा या यादीत समावेश करण्याची योजना आहे.

image1


                                                                 ‘मेक इन इंडिया’ आणि ‘ट्रान्स्फर ऑफ टेक्नॉलॉजी’च्या ट्रॅकच्या कामासाठीच्या उद्दिष्टांची यादी

sK_flH77Ng9yCttNED85-6Q22

                                      
                                                               ‘मेक इन इंडिया’ आणि ‘ट्रान्स्फर ऑफ टेक्नॉलॉजी’च्या इलेक्ट्रिकल कामासाठीच्या उद्दिष्टांची यादी

s1i9jpMM5SDig3XXtvrl5Lw224

                                                                    ‘मेक इन इंडिया’ आणि ‘ट्रान्स्फर ऑफ टेक्नॉलॉजी’च्या बांधकामासाठीच्या उद्दिष्टांची यादी

sybcEOx1u7vSkneSn--E-9g2


मेक इन इंडिया अंतर्गत येणाऱ्या खाली दिलेल्या मुद्द्यांबाबत थोडक्यात माहिती तुम्हाला आमच्या वेबसाइवरही मिळू शकेल website

 • OHE स्टील मास्ट
 • रेल टर्नओव्हर प्रिव्हेन्शन डिव्हाइस
 • एम्बेडेड इन्सर्ट्स
 • सिमेंट अस्फाल्ट मॉर्टर (CAM)  

 या व्यतिरिक्त अनेक सुटे भाग भारतात तयार करण्यात येणार असून, भारतातील पहिल्यावहिल्या अति-वेगवान रेल्वे प्रकल्पात वापरले जाणार आहेत. सद्यस्थितीत असलेल्या गरजा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेले स्रोत शोधण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्याची इत्यंभूत माहिती NHSRCL च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

भारत आणि जपान दोन्ही देशांसाठी मेक इन इंडिया हे अभियान फायदेशीर ठरू शकेल का?
image211या प्रकल्पामुळे भारतीय उद्योगजगताच्या शिरपेचात नक्कीच मानाचा तुरा खोवला जाणार आहे.  आपल्यासारख्या विकसनशील देशाच्या दृष्टिने विविध क्षेत्रांत अनेक वर्षे होणाऱ्या आर्थिक उलाढालींसारखी चांगली बातमी महत्त्वाची ठरेल.  भारतात गुंतवणूक आणि कारखाने उभारण्यासाठी जपानी फर्मचे स्वागत आहे. भारतीय फर्म आपल्या तांत्रिक कौशल्यांत वाढ करण्यासाठी या संधीचा फायदा करून घेतील. गतीने विकसित होणाऱ्या विशाल अशा भारतीय रेल्वे व मेट्रो रेल्वेच्या बाजारपेठत प्रवेश करण्याची संधीही त्यांना मिळणार आहे. भारतात कमी किमतीत उत्पादन झाल्यामुळे इतर देशांच्या तुलनेत जपानी उत्पादनांच्या किमती उत्तम स्पर्धा करू शकतील. जपानी लोकांना हा फायदा होणारच आहे पण भारतीयांनाही उत्तम तंत्रज्ञान, मॅन्युफॅक्चरिंग आणि बांधकामातील उत्कृष्ट कार्यप्रणालीचा अनुभव मिळणार आहे.
त्यामुळेच हा प्रकल्प हा दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ‘मेक इन इंडिया’ आयामासंबंधी अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा: nhsrcl.in

संदर्भसूची:

 1. https://bit.ly/2WI2Df0
 2. https://dipp.gov.in/
 3. www.makeinindia.com