हाय स्पीड रेल्वे यशस्वीरित्या सुरु राहण्यासाठी आवश्यक असलेला घटक म्हणजे सुसज्ज आणि आधुनिक देखभाल प्रणाली होय. एमएएचएसआर मधील हाय स्पीड रोलिंग स्टॉकच्या देखभालीसाठी, एमएएचएसआर कॉरिडॉरमध्ये तीन (3) मेंटेनन्स (देखभाल) डेपो असतील. डेपो (आगार) सुरत, ठाणे आणि साबरमती येथे असतील.
क्षेत्रफळानुसार, सूरत डेपो सर्वात छोटा डेपो असेल जो सुमारे 38 हेक्टर पर्यंत पसरलेला असेल आणि तोच ट्रॅक मेंटेनन्स डेपो देखील असेल. त्यानंतर ठाणे डेपो असेल जो जवळपास 58 हेक्टर पर्यंत असेल आणि सर्वात मोठा म्हणजे साबरमती डेपो ज्याचे क्षेत्रफळ अंदाजे 82 हेक्टर असेल.
ठाणे डेपो व सुरत डेपो येथे डेली इन्स्पेक्शन (दररोजची तपासणी), रेग्युलर इन्स्पेक्शन (नियमित तपासणी) व गाड्यांची अनशेड्युल्ड देखभाल करणे शक्य होणार आहे. दैनंदिन व नियमित तपासणी व रोलिंग स्टॉकची अनशेड्युल्ड देखभाल याखेरीज साबरमती डेपोत बोगी व सर्वसाधारण ओव्हरहॉलिंग सुविधा देखील उपलब्ध आहेत.
एमएएचएसआरच्या तिन्ही डेपोंमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट सिस्टम, अल्ट्रा-कार्यक्षम जलसाठ्यांचा वापर, सोलर पॅनेल्स इत्यादींची पुरेशी व्यवस्था असेल.
जीआयटी एमएएचएसआर अलाइनमेंटवरील ट्रॅक, वीजपुरवठा, सिग्नलिंग व दूरसंचार प्रणालीचे पॅरामीटर्स मोजण्यासाठी व तपासणी करण्यासाठी वापरली जाईल. ही ट्रॅक, वीजपुरवठा, सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आवश्यक प्रतिबंधात्मक देखभालीसाठी इनपुट म्हणून काम करेल.
जीआयटी 6 कारची असेल आणि 320 किमी प्रति तासाच्या वेगाने ऑपरेट करण्यासाठी डिझाइन केली जाईल.
जीआयटीकडे ट्रॅक, वीजपुरवठा, सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन सिस्टमची मोजमाप यंत्रांची स्थापना करण्यासाठी डेसिग्नेटेड मेझरमेंट रूम्स असतील. यामध्ये मेझरमेंट स्टाफसाठी खुर्च्या आणि टेबलांसह मिटींगसाठी जागा असेल. डीरेलमेंट(रेल्वे रुळावरून घसरणे) किंवा तत्सम घटना घडल्यास त्वरित उपाययोजना करण्यासाठी वापरल्या जाणार्या बचाव उपकरणांसाठी सुद्धा जनरल इनस्पेक्शन ट्रेनमधे जागा असेल.