नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉर (एमएएचएसआर सी-5 पॅकेज) साठी गुजरात राज्यातील वडोदरा येथे एचएसआर स्टेशनसह सुमारे 8 किमी व्हायडक्टच्या डिझाइन आणि बांधकामासाठी मेसर्स लार्सन अँड टुब्रो लिमिटेड यांच्यासोबत आज एका करारावर स्वाक्षरी केली.
रेल्वेसोबत अखंड एकत्रीकरण सुनिश्चित करण्यासाठी, वडोदरा एचएसआर स्टेशन भारतीय रेल्वेच्या वडोदरा स्टेशनच्या विद्यमान प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर बांधण्याची योजना आहे. या एकत्रीकरणामुळे, प्रवाशांना एचएसआर आणि भारतीय रेल्वे यांच्यात सहज हस्तांतरण करणे सोपे होईल.
आत्तापर्यंत, एनएचएसआरसीएलने गुजरात राज्यातील एमएएचएसआर (मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉर) संरेखण (अलाइनमेंट) च्या बांधकामासाठी 100% सिव्हिल करार (एकूण एमएएचएसआर कॉरिडॉरच्या 508 किमीपैकी 352 किमी) केले आहेत, ज्यामध्ये आठ (08) एचएसआर स्टेशन (साबरमती, अहमदाबाद, आणंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलिमोरा आणि वापी) आणि साबरमती आणि सुरत येथे दोन रोलिंग स्टॉक डेपो समाविष्ट आहेत.
संचालक (प्रकल्प), श्री राजेंद्र प्रसाद आणि एनएचएसआरसीएलचे इतर संचालक आणि लार्सन अँड टुब्रो लिमिटेडचे अधिकारी यांनी करार स्वाक्षरी सोहळ्याला हजेरी लावली.

