बुलेट ट्रेन स्थानकांची संकल्पना आधुनिक जीवनशैलीचे प्रवेशद्वार म्हणून केली जाते. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरवरील प्रत्येक स्थानकाच्या डिझाइनमध्ये ते ज्या शहरात येत आहे त्या शहराच्या भावनेचे प्रतिबिंब उमटणार आहे. यामुळे स्थानिक जनतेशी तात्काळ संपर्क निर्माण करेल आणि भारतातील पहिल्या हाय-स्पीड प्रणालीविषयी अभिमानाची आणि आपलेपणाची भावना निर्माण करेल.
रेल्वे, मेट्रो, बस, टॅक्सी आणि ऑटो अशा इतर माध्यमांशी एकरूप होऊन स्थानकापर्यंत आणि ये-जा करण्यासाठी अलाइनमेंटवरील स्थानके ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित केली जातील. अशा इंटरफेसमुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, सुलभता वाढेल आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वापरास प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे आपल्या शहरांमध्ये गर्दी आणि उत्सर्जन कमी होईल.
प्रवासी, भागधारकांची सुलभता आणि सुविधा वाढविण्यासाठी आणि स्थानकांभोवती आर्थिक क्रियाकलापांना चालना देण्यासाठी, बुलेट ट्रेन स्थानकांच्या सभोवतालच्या परिसराचा टीओडी (ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट) च्या धोरणांनुसार विकास करण्याची योजना आहे.
गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, गुजरात आणि महाराष्ट्र सरकार यांच्या सहकार्याने आणि जपानमधील अशाच यशस्वी प्रकल्पांचा दशकांचा अनुभव घेऊन येणाऱ्या जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जेआयसीए) च्या भागीदारीसह, मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पासह (स्मार्ट) स्टेशन एरिया डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत जागतिक दर्जाचे स्टेशन एरिया डेव्हलपमेंट तंत्र सादर करणे हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे
टीओडी योजना जागतिक सर्वोत्तम पद्धतींशी सुसंगत आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी जेआयसीएच्या भूमिकेत तांत्रिक मार्गदर्शन आणि कौशल्य प्रदान करणे समाविष्ट असेल.
गुजरातमधील साबरमती आणि सुरत आणि महाराष्ट्रातील विरार आणि ठाणे या चार स्थानकांची निवड राज्य सरकारने केली आहे.
ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी) चे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत:
1.) सुधारित सुलभता आणि कमी गर्दी: या प्रकल्पामुळे स्थानकांपर्यंत प्रवेश सुलभ होईल आणि प्रवाशांना सहज वाहतुकीचा अनुभव मिळेल.
2.) स्टेशन परिसरातील कॉर्पोरेट कार्यालये, हॉटेल्स, शैक्षणिक संस्था आणि आरोग्य सुविधा यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचा विकास करून चालण्यायोग्य अंतरावर एचएसआर स्थानकांभोवती मिक्स युज डेव्हलपमेंट करणे, एक संपूर्ण शहरी पर्यावरण तयार करणे.
3.)स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना:टीओडी उपक्रमामुळे स्थानकांभोवती व्यावसायिक उपक्रमांना चालना मिळेल, स्थानिक व्यवसायांना फायदा होईल आणि प्रादेशिक अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, अशी अपेक्षा आहे.
4.) लँड व्हॅल्यू कॅप्चरद्वारे महसूल निर्मिती: प्रीमियम एफएसआय/एफएआर, विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) इत्यादी नागरी नियोजन साधनांद्वारे विकास उपक्रमांना मदत केली जाऊ शकते.
5.) शाश्वत नागरी विकास: या प्रकल्पामुळे आजूबाजूच्या शहरांना राहण्यायोग्य, शाश्वत नागरी केंद्रे म्हणून प्रोत्साहन मिळेल, गुंतवणूक आकर्षित होईल आणि रहिवाशांचे जीवनमान सुधारेल.
टीओडी उपक्रम टप्प्याटप्प्याने राबविण्यासाठी डिझाइन केला गेला आहे, ज्यामुळे दीर्घकालीन शाश्वतता आणि स्केलेबिलिटी सुनिश्चित होईल. हा प्रकल्प स्टेशन स्तरावरील तात्कालिक गरजा आणि भविष्यात व्यापक प्रादेशिक विकास या दोन्ही गरजा पूर्ण करेल.
अतिरिक्त माहिती:
क्षेत्र | वर्णन | कृती/नियोजन |
---|---|---|
एरिया 1 | बुलेट ट्रेन स्थानकाचा जवळचा परिसर, पिक अँड ड्रॉप ऑफ, पार्किंग, पॅसेंजर प्लाझा डेवलपमेंट | स्टेज 1 च्या विद्यमान पायाभूत सुविधांशी सुरळीत एकीकरण सुनिश्चित करण्यासाठी विविध राज्य नियोजन प्राधिकरणांशी समन्वय साधून सर्व स्थानकांसाठी मल्टी-मॉडेल इंटिग्रेशन (एमएमआय) योजना आधीच पूर्ण झाल्या आहेत. |
एरिया 2 | स्थानकाच्या मुखापासून 200-500 मीटरपर्यंत आणि प्रवासी सुविधा असतील |
स्टेशनच्या सभोवतालचा परिसर गुजरात आणि महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीतील विविध शहर प्राधिकरणांद्वारे विकसित केला जाईल याची आवश्यकता असू शकते: |
एरिया 3 | बुलेट ट्रेन स्थानकापासून 500-800 मीटर पर्यंत ज्यात मध्यम ते दीर्घकालीन विकासाचा समावेश असेल | HSR कनेक्टिव्हिटीचा वापर करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या शहराच्या दृष्टीच्या आधारे झोन 2 च्या पलीकडे असलेला प्रभाव क्षेत्र विकसित केला जाईल. यामध्ये शहरी नियोजन साधनांचा समावेश असू शकतो जसे की जमिनीच्या वापरातील बदल, विकास हक्कांचे हस्तांतरण (TDR) इ. 10 वर्षांहून अधिक कालावधीचा कालावधी लक्षात घेऊन शहर प्राधिकरणाकडून या परिसराचा विकास केला जाईल. |