Published Date
बोईसर हे मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात मोठे औद्योगिक उपनगर आहे. लवकरच या औद्योगिक उपनगराला निर्माणाधीन बोईसर बुलेट ट्रेन स्टेशनशी कनेक्टिव्हिटीला चालना मिळणार आहे. बुलेट ट्रेन सुरू झाल्याने मुंबईच्या मध्यवर्ती भागातील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते बोईसर दरम्यानचा एकूण प्रवास 36 मिनिटांचा होणार आहे.
- बोईसर बुलेट ट्रेन स्टेशनच्या दर्शनी भागाचे डिझाइन या भागातील कोकणी मच्छीमारांकडून वापरल्या जाणार्या मासेमारी जाळ्यांपासून प्रेरित आहे
- स्थान: हे स्थानक बोईसर-चिल्लर राज्य महामार्गावर (क्र. 32), ग्रामपंचायत माणजवळ (गाव - बेटेगाव व माण) आहे
- बोईसर बुलेट ट्रेन स्टेशनपासून NH 48 (दिल्ली - चेन्नई) 13.6 किमी आणि बोईसर पश्चिम रेल्वे स्थानक व बोईसर बस स्थानक 6 किमी अंतरावर आहे
- स्थानक सुविधा:
- दोन मजली स्टेशन इमारतीत लाउंज, वेटिंग रूम (पेड आणि अनपेड एरिया दोन्ही), स्मोकिंग रूम, प्रथमोपचार, टॉयलेट रूम आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा, लेव्हल चेंजसाठी लिफ्ट आणि एस्केलेटर, कन्कोर्स स्तरावर पेड आणि अनपेड क्षेत्रातील दुकाने असतील
- स्थानक इमारतीबाहेर - खासगी कार, टॅक्सी, दुचाकी आणि बससाठी पार्किंग, ऑटो स्टँड, स्टेशन प्लाझा, ग्रीन एरिया/ उद्याने.
- स्थानकाच्या सभोवतालची औद्योगिक व पर्यटन स्थळे
- बोईसर व तारापूर औद्योगिक क्षेत्र
- तारापूर अणुऊर्जा केंद्र व बीएआरसी
- वाढवण बंदर
- पर्यटनस्थळे – चिंचणी बीच, नांदगाव बीच, शिरगाव बीच, केळवा बीच, डहाणू आणि बोर्डी बीच, हिरडपाडा आणि काळमांडवी धबधबा, महालक्ष्मी मंदिर.