मुख्य सामग्रीवर जा
मुख्य सामग्रीवर जा
Mar

NATIONAL HIGH SPEED RAIL CORPORATION LIMITED

नेशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

महाराष्ट्रातील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू

Published Date

महाराष्ट्रातील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या 135 किमी लांबीच्या एलिव्हेटेड सेक्शनचे बांधकाम हे या हायस्पीड रेल्वे प्रकल्पातील एक आव्हानात्मक विभाग आहे. गुजरात-महाराष्ट्र सीमेजवळील शिळफाटा ते झारोली गावादरम्यान असलेला हा मार्ग ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मुंबई महानगर प्रदेशातील 95 गावे आणि शहरांमधून जाणार आहे.
या आव्हानात्मक बांधकामाची मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:

वायडक्ट आणि पूल : 135 किमीपैकी 124 किमीमध्ये 11 स्टील पुलांसह वायडक्ट आणि पूल असतील.

डोंगर आणि बोगदे : या विभागात 7 डोंगरी बोगदे असतील.

स्थानके आणि डेपो : ठाणे, विरार आणि बोईसर या तीन स्थानकांसह ठाणे येथे रोलिंग स्टॉक डेपोचे नियोजन आहे.

क्रॉसिंग: मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्ग, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, मुंबई उपनगरीय मार्ग आणि एलिव्हेटेड मुंबई मेट्रो लाइन 5 यासह अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधांमधून हा मार्ग पार करेल. राष्ट्रीय महामार्ग-48 आणि मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग-3 या प्रमुख महामार्गांवरही हा मार्ग जाणार आहे.

नदी पूल: या विभागात चार प्रमुख नद्यांवर पूल असतील, सर्वात आव्हानात्मक उल्हास नदीवरील 460 मीटर स्टील पूल (100 + 130, 130 + 100 मीटर स्पॅन) आहे, जी प्रकल्पातील सर्वात वजनदार स्टील संरचना असेल (9672 मेट्रिक टन). वैतरणा नदीवरील सर्वात लांब पूल 2.32 किमी लांबीचा असेल.

वन्यजीव अभयारण्य : उत्तर-पश्चिम महाराष्ट्रातील वन्यजीवांसाठी काही पर्यावरणीय हॉटस्पॉट - संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (एसजीएनपी) आणि तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य (टीडब्ल्यूएस) यां ठिकाणांच्या जवळून हे संरेखन असेल. या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. मुंबईपासून जवळ असल्याने रेल्वे मार्ग, महामार्गासह अन्य पायाभूत सुविधाप्रकल्पही या भागात येत आहेत.

बांधकाम प्रगतीमध्ये भू-तांत्रिक तपासणी जवळजवळ पूर्ण होणे, डोंगरी बोगद्यांचे काम सुरू करणे आणि घाटाच्या कामासाठी अंदाजे 265 ओपन फाऊंडेशन (सुमारे 11 किमी) पूर्ण करणे हे समाविष्ट आहे. बोईसर आणि विरार स्थानकांवरही पायाभरणीचे काम सुरू झाले आहे.

या महत्त्वाच्या भागाचे बांधकाम जसजसे पुढे जात आहे, तसतसे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प या भागातील प्रवासात परिवर्तन करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे आला आहे. अभियांत्रिकीच्या गुंतागुंतीच्या आव्हानांवर मात करून दाट लोकवस्ती आणि संरक्षित वन्यजीव अभयारण्यांमधून प्रवास करणारा हा विभाग पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल, प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल आणि देशासाठी वाहतुकीचे नवे युग सुरू होईल. 
 

Related Images