Skip to main content

एनएचएसआरसीएलने मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरसाठी गेल्या महिन्याभरात तीन नदी पूल बांधले

Published Date

एमएएचएसआर कॉरिडॉरवर गुजरात राज्यात गेल्या महिनाभरात तीन नदी पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

नवसारी जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील पहिला नदी पूल पूर्ण झाला.

पुलाची ठळक वैशिष्ट्ये :

 • पुलाची लांबी ३६० मीटर आहे
 • ०९ (नऊ) फुल स्पॅन गर्डर (प्रत्येकी ४० मीटर) यांचा समावेश आहे
 • पिअर्सची उंची - १० मीटर ते २० मीटर
 • ४ मीटर व ५ मीटर व्यासाचे वर्तुळाकार पिअर्स
 • हा पूल बिलिमोरा आणि सुरत एचएसआर स्थानकादरम्यान आहे
 • बांधकामादरम्यान अरबी समुद्रातील उंच-खालच्या लाटांचे सातत्याने निरीक्षण करण्यात आले.
 • उंच भरतीच्या वेळी नदीतील पाण्याची पातळी ५-६ मीटर (पाक्षिक) वाढत असल्याने पायाभरणीचे काम आव्हानात्मक होते

नवसारी जिल्ह्यातील मिंधोला नदीवरील दुसरा पूल पूर्ण झाला.

पुलाची ठळक वैशिष्ट्ये :

 • पुलाची लांबी २४० मीटर आहे
 • ०६ (सहा) फुल स्पॅन गर्डर (प्रत्येकी ४० मीटर) यांचा समावेश आहे
 • पिअर्सची उंची- १० मीटर ते १५ मीटर
 • ४ मीटर व्यासाचे वर्तुळाकार पिअर्स
 • हा पूल बिलिमोरा आणि सुरत एचएसआर स्थानकादरम्यान आहे
 • बांधकामादरम्यान अरबी समुद्रातील उंच-खालच्या लाटांचे सातत्याने निरीक्षण करण्यात आले.

नवसारी जिल्ह्यातील अंबिका नदीवरील तिसरा नदीपूल पूर्ण झाला.

पुलाची ठळक वैशिष्ट्ये :

 • पुलाची लांबी २०० मीटर आहे
 • ०५ (पाच) फुल स्पॅन गर्डर (प्रत्येकी ४० मीटर) यांचा समावेश आहे
 • पिअर्सची उंची- १२.६ मीटर ते २३.४ मीटर
 • ४ मीटर, ५ मीटर व ५.५ मीटर व्यासाचे वर्तुळाकार पायर्स
 • हा पूल बिलिमोरा आणि सुरत एचएसआर स्थानकादरम्यान आहे
 • बांधकाम करताना नदीपात्राचा खडतर उतार, गाळ काढताना भूमिगत खडकाळ थर, सतत पाण्याची गळती आणि सुमारे २६ मीटर उंचीपर्यंत (पियर कॅपसह) नदीच्या आत काम करणे आदी आव्हानांना सामोरे जावे लागले

गेल्या सहा महिन्यांत एमएएचएसआर कॉरिडॉरसाठी आतापर्यंत चार नदीपूल पूर्ण झाले आहेत.

एमएएचएसआर कॉरिडॉरवर (गुजरात आणि महाराष्ट्र) एकूण 24 नदी पूल आहेत, त्यापैकी 20 गुजरातमध्ये आणि 04 महाराष्ट्रात आहेत.

गुजरातमधील नर्मदा नदीवर १.२ किमी लांबीचा सर्वात लांब नदी पूल बांधण्यात येत असून महाराष्ट्रातील वैतरणा नदीवर २.२८ किमी लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे.

एमएएचएसआर प्रकल्प स्थिती

 • पायल : ३०५.९ कि.मी.
 • फाउंडेशन: 251.2 किमी
 • पियर: 208.9 किमी
 • वायडक्ट: 69.3 कि.मी.
 • गुजरातमधील एचएसआर स्थानके : वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती या आठ एचएसआर स्थानकांचे काम बांधकामाच्या विविध टप्प्यात आहे.
एचएसआर स्टेशन रेल लेव्हल स्लॅब  कॉनकोर्स लेव्हल स्लॅब
सुरत 300 मी. 450 मी. (पूर्ण)
आणंद 250 मी. 425 मी.  (पूर्ण)
बिलिमोरा 100 मी. कॉनकोर्स केवल जमीनी स्तर पर
अहमदाबाद कामाला सुरुवात झाली आहे 137 m

 

एनएचएसआरसीएल के प्रबंध निदेशक, श्री राजेंद्र प्रसाद ने कहा, "नदियों पर पुलों का निर्माण बहुत ही चुनौतीपूर्ण है और इसके लिए सूक्ष्म योजना की आवश्यकता होती है। मिंधोला और पूर्णा नदियों पर पुलों के निर्माण के दौरान, अरब सागर से आने वाली टाइडल लहरों के प्रवाह पर विशेष ध्यान रखा गया। हमारे इंजीनियरों द्वारा अंबिका नदी पर, पुल निर्माण के लिए लगभग 26 मीटर की ऊंचाई पर काम किया गया”।

Related Images