एमएएचएसआर कॉरिडॉरवरील गुजरात राज्यात मागील एका महिन्यात 3 नदी पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
पहिला पूल पूर्णा नदी, नवसारी जिल्ह्यात बांधण्यात आला.
नदी पुलाची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
• पुलाची लांबी 360 मीटर
• हा पूल 9 (नऊ) फुल स्पॅन बॉक्स गर्डर (प्रत्येकी 40 मीटर) वापरून बांधला आहे
• पिलर्सची उंची – 10 ते 20 मीटर आहे
• यात 4 मीटर आणि 5 मीटर व्यासाचे गोलाकार पिलर आहेत
• हा पूल बिलिमोरा आणि सुरत एचएसआर स्टेशनच्या दरम्यान आहे
• बांधकामादरम्यान समुद्राच्या भरतीच्या लाटांच्या प्रवाहावर विशेष लक्ष देण्यात आले
• मोठ्या भरतीच्या वेळी नदीची पाण्याची पातळी (प्रत्येक 15 दिवसांत) 5-6 मीटरने वाढल्यामुळे, पायाचे काम आव्हानात्मक होते
दुसऱ्या पुलाचे बांधकाम मिंधोला नदी, नवसारी जिल्ह्यात करण्यात आले.
नदी पुलाची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
• पुलाची लांबी 240 मीटर आहे
• हा पूल 6 (सहा) फुल स्पॅन गर्डर (प्रत्येकी 40 मीटर) वापरून बांधला आहे
• पिलर्सची उंची - 10 ते 15 मीटर आहे
• यात 4 मीटर व्यासाचे गोलाकार पिलर आहेत
• हा पूल बिलिमोरा आणि सुरत एचएसआर स्टेशनच्या दरम्यान आहे
• बांधकामादरम्यान समुद्राच्या भरतीच्या लाटांच्या प्रवाहावर विशेष लक्ष देण्यात आले
तिसरा पूल अंबिका नदी, नवसारी जिल्ह्यात पूर्ण झाला आहे.
नदी पुलाची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
• पुलाची लांबी 200 मीटर आहे
• हा पूल 5 (पाच) फुल स्पॅन गर्डर (प्रत्येकी 40 मीटर) वापरून बांधला आहे
• पिलर्सची उंची - 12.6 ते 23.4 मीटर आहे
• यात 4, 5 आणि 5.5 मीटर व्यासाचे गोलाकार पिलर आहेत
• हा पूल बिलिमोरा आणि सुरत एचएसआर स्टेशनच्या दरम्यान आहे
• बांधकामादरम्यान, नदीच्या किनाऱ्याची तीव्र उतारा, पाइलिंग दरम्यान भूमिगत खडकांचे थर, सतत पाण्याची गळती आणि सुमारे 26 मीटर पिलर्सची उंची (पियर कॅपसह) साठी नदीच्या आत काम करणे इत्यादींसारख्या इतर आव्हानांचा सामना करावा लागला
आतापर्यंत, मागील सहा महिन्यांत एमएएचएसआर कॉरिडॉरसाठी 4 (चार) नदी पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
एमएएचएसआर कॉरिडॉरवर (गुजरात आणि महाराष्ट्र) एकूण 24 नदी पूल आहेत, त्यापैकी 20 गुजरातमध्ये आणि 4 महाराष्ट्रात आहेत.
गुजरातमध्ये, 1.2 कि.मी. लांबीचा सर्वात मोठा नदी पूल नर्मदा नदीवर बांधला जात आहे आणि महाराष्ट्रात 2.28 कि.मी. लांबीचा सर्वात मोठा पूल वैतरणा नदीवर बांधला जाईल.
एमएएचएसआर प्रकल्पाची स्थिती:
- पाइल: 305.9 कि.मी.
- फाउंडेशन: 251.2 कि.मी.
- पियर: 208.9 कि.मी.
- व्हायाडक्ट: 69.3 कि.मी.
- गुजरातमध्ये एचएसआर स्टेशन्स: 8 एचएसआर स्टेशन्स: वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती येथे बांधकाम विविध टप्प्यांवर आहे.
| एचएसआर स्टेशन | रेल लेवल स्लॅब | कॉनकोर्स लेवल स्लॅब |
|---|---|---|
| सुरत | 300 मीटर | 450 मीटर (पूर्ण) |
| आणंद | 250 मीटर | 425 मीटर (पूर्ण) |
| बिलिमोरा | 100 मीटर | कॉनकोर्स केवळ जमिनीच्या पातळीवर |
| अहमदाबाद | काम सुरु झाले आहे | 137 मीटर |
एनएचएसआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक, श्री राजेंद्र प्रसाद म्हणाले, "नद्यांवर पूल बांधणे खूपच आव्हानात्मक आहे आणि यासाठी सूक्ष्म नियोजनाची आवश्यकता असते. मिंधोला आणि पूर्णा नद्यांवरील पुलांच्या बांधकामादरम्यान, अरबी समुद्रातून येणाऱ्या भरतीच्या लाटांच्या प्रवाहावर विशेष लक्ष ठेवण्यात आले. आमच्या अभियंत्यांनी अंबिका नदीवर, पूल बांधकामासाठी सुमारे 26 मीटर उंचीवर काम केले”.

