मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यात, गुजरातमधील भरुच जवळील डीएफसीसी मार्गांवर 100 मीटर लांबीचा पोलादी पूल यशस्वीरित्या सुरू करण्यात आला. या प्रकल्पासाठी गुजरातमध्ये बांधण्यात येणारा हा आठवा स्टील पूल आहे आणि संपूर्ण कॉरिडॉरसाठी १७ स्टील पूल आणि २८ स्टील पूल आहेत.
सुमारे 1,400 मेट्रिक टन वजनाचा हा पूल 14.6 मीटर उंच असून 14.3 मीटर रुंद आहे. हा पूल तिरूचिरापल्ली येथील कार्यशाळेत तयार करण्यात आला आणि खास डिझाइन केलेल्या ट्रेलर्सद्वारे साईटवर नेण्यात आला. हा पूल 84 मीटर लांब ‘लॉन्चिंग नोज’च्या साहाय्याने स्थापित करण्यात आला, ज्याचे वजन सुमारे 600 मेट्रिक टन आहे.
या पुलाच्या निर्मितीसाठी सुमारे 55,300 ‘टॉर-शिअर प्रकाराचे उच्च ताकदीचे (टीटीएचएस)’ बोल्ट वापरण्यात आले असून, यावर सी5 प्रणालीचे रंगकाम करण्यात आले आहे आणि 100 वर्षांच्या आयुष्यासाठी डिझाइन केलेल्या इलास्टोमेरिक बेअरिंग वापरण्यात आल्या आहेत. हा पूल जमिनीपासून 18 मीटर उंच असलेल्या तात्पुरत्या ट्रेसल्सवर जोडण्यात आला आणि दोन अर्ध-स्वयंचलित जॅक्सच्या स्वयंचलित यंत्रणेद्वारे ओढण्यात आला. प्रत्येक जॅकची क्षमता 250 टन असून मॅक-अॅलॉय बार्सचा वापर करण्यात आला.
पुलाची स्थापना अतिशय काळजीपूर्वक नियोजित ट्रॅफिक ब्लॉक्सच्या माध्यमातून डीएफसीसी मार्गांवर अचूकपणे पार पडली. मालवाहतुकीला कमीत कमी अडथळा निर्माण होईल याची खात्री करताना सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे ब्लॉक्स टप्प्याटप्प्याने लागू करण्यात आले.
गुजरातमधील पूर्ण झालेल्या पोलादी पुलांची माहिती
| अनुक्रमांक | ठिकाण | पोलादी पुलाची लांबी (मीटरमध्ये) | पोलादी पुलाचे वजन (मेट्रिक टनमध्ये) |
|---|---|---|---|
| 1 | राष्ट्रीय महामार्ग 53, सुरत येथे | 70 | 673 |
| 2 | नाडियादजवळील भारतीय रेल्वेच्या वडोदरा-अहमदाबाद मुख्य मार्गावर | 100 | 1486 |
| 3 | वडोदऱ्याजवळील दिल्ली-मुंबई राष्ट्रीय एक्सप्रेसवेवर | 230 (130 + 100) | 4397 |
| 4 | दादरा आणि नगर हवेलीतील सिल्वासा जवळ | 100 | 1464 |
| 5 | वडोदरा येथे वेस्टर्न रेल्वेवर | 60 | 645 |
| 6 | सुरत येथे दोन डीएफसीसी मार्ग आणि दोन वेस्टर्न रेल्वे मार्गांवर | 100, 60 | 2040 |
| 7 | वडोदरा जवळील दोन डीएफसीसी मार्गांवर | 70 | 674 |
| 8 | भरुच जवळील डीएफसीसी मार्गांवर | 100 | 1400 |

